1. बातम्या

वर्षभर मागणी असलेली काळी मिरची शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान, तीन महिन्यांमध्ये शेतकरी मालामाल

भारतात अनेक ठिकाणी अजूनही पारंपारीक शेती केली जाते. यामध्ये काही वेळेस चांगले पैसे मिळतात. मात्र अनेकदा मोठे नुकसानही होते. असे असताना काही पिके ही हमखास पैसे मिळवून देतात, त्याला वर्षभर मागणी असते. सध्या मोठ्या प्रमाणातील क्षेत्रावर मसाल्याचे पदार्थांचे उत्पादन घेतले जाते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Pepper

Pepper

भारतात अनेक ठिकाणी अजूनही पारंपारीक शेती केली जाते. यामध्ये काही वेळेस चांगले पैसे मिळतात. मात्र अनेकदा मोठे नुकसानही होते. असे असताना काही पिके ही हमखास पैसे मिळवून देतात, त्याला वर्षभर मागणी असते. सध्या मोठ्या प्रमाणातील क्षेत्रावर मसाल्याचे पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. तर जवळपास सर्वच मसाल्यांची लागवड ही देशभरात केली जात आहे. त्यापैकीच एक असलेली काळी मिरची. या काळ्या मिरचीला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम मागणी असते. यामुळे हे एक हमखास पैसे मिळवून देणारे पीक आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याकडे वळण्यास हरकत नाही.

या मिरचीची लागवडपध्दती आणि त्यासाठी लागणारा खर्च सर्वकाही अटोक्यात असल्याने मिरची काळी असली तरी शेतकऱ्यांना मालामाल करणारी आहे. अनेक शेतकरी याचे नित्यनेमाने पीक घेतात. या मिरचीसाठी तीव्र सुर्यप्रकाश आणि योग्य आर्द्रता असलेले वातावरण पोषक असते. मिरपूडची झाडे वेलीसारखी वाढतात. काळी मिरीचीची दोन टप्प्यात पेरणी होते. पहिल्या टप्प्यात वनस्पती तयार होते आणि दुसऱ्या टप्प्यात रोपाचे प्रत्यारोपण केले जाते. यानंतर याच्या लागवडीची प्रक्रिया सुरु होते.

याची देशात सर्वाधिक लागवड ही केरळात केली जात आहे. एकूण उत्पादनाच्या 98 टक्के उत्पादन केवळ केरळातून घेतले जात आहे. यानंतर कर्नाटक, अंदमान निकोबार बेटे, महाराष्ट्र आणि पांडेचेरी येथे लागवड केली जाते. महाराष्ट्रात देखील याकडे आता अनेक शेकतरी वळाले आहेत. काळ्या मिरचीचा वापर शक्यतो गरम मसल्यासाठी केला जातो. ही मिरची झाडांच्या मुळाजवळ लावली जाते. त्यामुळेच वेलीप्रमाणे ती झाडावर वाढते आणि उत्पादनही अधिकचे मिळते.

हिरवे गुच्छ दिसू लागले की नोव्हेंबरमध्ये तोडणी करता येते. योग्य जोपासणा झाली तर एका रोपाला साधारणतः दीड किलो कोरडी काळी मिरी मिळते. यामुळे यामधून लाखो रुपये आपल्याला मिळतात. मिरचीची झाडे वर चढू लागली की छाटणीचे काम करावे लागते. मिरपूडची झाडे वेलीसारखी वाढतात. त्यामुळे त्यांची वाढ होण्यासाठी उंचच उंच झाडांची गरज असते. हेच कारण आहे की रिकाम्या क्षेत्रात काळी मिरचा न पेरता उंच झाडे असलेल्या बागांमध्ये लागवड केली जाते. यामुळे यामधून चांगले पैसे मिळू शकतात.

English Summary: Pepper, which is in demand throughout the year, is a boon for the farmers Published on: 04 February 2022, 10:38 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters