1. बातम्या

कोविड-१९ ला हरविण्यासाठी लोक वळले आयुर्वेदाकडे ; वाढली औषधांची विक्री

आयुर्वेदिक औषधांचे फायदा हे प्रत्येकांना माहिती आहे. सध्या कोरोना व्हायरस ( corona virus) मुळे लोकांचा ओढा परत आयुर्वेदिक औषधांकडे वळत आहे, त्यात पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांनीही आवाहन करत आयुष मंत्रालयाच्या नियम पाळण्यास सांगितले आहे. आयुष मंत्रालयाच्या मतानुसार, आयुर्वेद कोरोनापासून वाचण्यासाठी एक सोपा आणि दमदार उपाय आहे.

KJ Staff
KJ Staff


आयुर्वेदिक औषधांचे फायदा हे प्रत्येकांना माहिती आहे. सध्या कोरोना व्हायरस (corona virus) मुळे लोकांचा ओढा परत आयुर्वेदिक औषधांकडे वळत आहे,  त्यात पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांनीही आवाहन करत आयुष मंत्रालयाच्या नियम पाळण्यास सांगितले आहे. आयुष  मंत्रालयाच्या मतानुसार, आयुर्वेद कोरोनापासून वाचण्यासाठी एक सोपा आणि दमदार उपाय आहे. आयुर्वेदात असे काही घटक आहेत, ज्यातून रोग प्रतिकारक शक्ती (Immune system) वाढते.  कोरोना (covid-19)  आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती (Immune system) ला संपवत असतो. 

यामुळे आपण जर आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immune system) वाढवली तर कोरोनाशी दोन हात करण्यास आपण सक्षम असू. यामुळे आयुर्वेदाकडे लोकांच्या ओढा वाढला आहे.  यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आयुर्वेदिक औषधांची विक्री वाढली आहे.  नोएडा येथील केमिस्ट रितेश अग्रवाल म्हणाले की, कोरोनाच्या कारणामुळे लोक इम्युनिटी वाढवणारे औषध अधिक घेत आहेत. यात  मध, गिलोय, विटामिन सी च्या गोळ्या, तुळशी, विटामीन, आयरनच्या गोळ्या आणि बाकी देशी औषधे घेत आहेत. विशेष म्हणजे हे औषध निरोगी व्यक्तीही घेऊन जात आहेत. यामुळे आयुर्वेदिक रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध अधिक विकले जात आहेत,  औषध घेणारे लोक मोदी सरकारला फॅलो करत असून आयुष मंत्रालयाचे नियम पाळत आहेत.  मंत्रालयाकडून सांगण्यात आलेले औषधे लोक खरेदी करत आहेत. तुळशी ड्राप, त्रिकूट चूर्ण काढा, गिलोय गोळ्या आदी औषधांची विक्री अधिक होत आहे.

English Summary: people turn to Ayurveda to defect covid-19 ; medicine sale increased Published on: 20 April 2020, 10:47 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters