चीनच्या मागणीमुळे शेंगदाणा दरात दहा टक्क्यांची सुधारणा

30 March 2021 01:54 PM By: KJ Maharashtra
शेंगदाणा दरात दहा टक्क्यांची सुधारणा

शेंगदाणा दरात दहा टक्क्यांची सुधारणा

जर गेल्या वर्षीचा विचार केला तर शेंगदाण्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात कमी होत आहे. जर पुढील येणाऱ्या दीड महिन्याचा बाजाराचा विचार केला तर आवक वाढेल अशी शक्यता आहे. त्यातच देशांतर्गत आणि इतर आशियाई देश जसे की चीन इत्यादी देशांकडून शेंगदाण्याची मागणी वाढल्याने शेंगदाण्याच्या दरांमध्ये जवळजवळ दहा टक्के वाढ झाली आहे.

जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर इतर तेलबियांच्या दरात आणि खाद्य तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे शेंगदाणा दर आला आधार मिळत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.यासोबतच बाजारातील साठेबाज आणि कारखाने यांच्याकडून शेंगदाण्याचा असलेला साठा कमी झाल्याने सगळ्यांच्या आशा या रब्बी हंगामात येणाऱ्या पिकाकडे लागला आहेत. येणाऱ्या पुढील पाच ते सहा आठवड्यात शेंगदाण्याचे आवकेत वाढ होण्याचे संकेत आहेत, यापूर्वी शेंगदाण्याचे किमतीत दहा टक्के सुधारणा झाली आहे.

 

जर आपण गुजरात राज्यातील प्रमुख बाजारपेठांचा विचार केला तर तेथील शेंगदाण्याच्या किमती प्रति 20 किलो ला अकराशे पंच्याहत्तर ते बाराशे रुपये आहेत. या असलेल्या भावात सुद्धा अजून 75 ते 120 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.खरिपात देशपातळीवर भुईमुगाची लागवड साधारणपणे 42 लाख हेक्‍टरवर होते. या 42 लाख हेक्‍टर पैकी 15 लाख हेक्‍टर लागवड क्षेत्र गुजरात मध्ये असते.  जरमहाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तेलबियांचे खरिपातील प्रमुख म्हणजे सोयाबीन. महाराष्ट्रात भुईमूग खाली लागवड क्षेत्र हे दोन लाख हेक्टर आहे.

 

भारतामध्ये रब्बी हंगामात जवळजवळ सात लाख हेक्टर वर  भुईमूग लागवड होते.  सरकारी आकडेवारीनुसार कर्नाटक,तामिळनाडू आणि तेलंगणा हे प्रमुख राज्य आहेत.

china Peanut prices चीन शेंगदाणा
English Summary: Peanut prices up 10 per cent on demand from China

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.