शेती क्षेत्रासाठी विविध प्रकारचे संशोधन आणि विविध पिकांच्या विविध जाती यावर संशोधन करून कृषी विद्यापीठे मोलाची भर घालत आहेत.
असेच एक कौतुकास्पद काम अकोला कृषी विद्यापीठाने केले असून या विद्यापीठातील भाजीपाला शास्त्र विभागातील तज्ञांनी पीडीकेव्ही ऋतुजा या चवळीच्या नवीन वाणाचीनिर्मिती केली असून या वाणाची केंद्रीय वान प्रसारण समितीने देखील केंद्रीय समितीने हेवान राज्यांसाठी अधिसूचित केले आहे. ही गोष्ट अकोला विद्यापीठासाठी गौरवास्पद असून आता या वानाचा वापर शेतकरी रब्बी व खरीप हंगामासाठी करू शकणार आहेत.मागील बऱ्याच वर्षापासून मागील बऱ्याच वर्षापासून यावर तज्ञ संशोधन करीत होते व या उपक्रमाला आता यश मिळाले आहे.
पीडीकेव्ही ऋतुजा या वाणाची वैशिष्ट्ये
- हे वाण कमी कालावधीमध्ये अधिकचे उत्पन्न देणारे असून अवघे 55 ते 60 दिवसात फुलोऱ्यात येते.
- शेंगा आकर्षक असून शेंगांची लांबी 15 ते 20 सेंटिमीटर असते.
- एका शेंगे मध्ये दहा ते बारा बीया असतात.
- हा वाण उंचीने बुटका असून यासाठी याला कोणत्याही आधाराची गरज नाही.
- या वाणाच्या लागवड माध्यमातून एका हेक्टर मध्ये 80 ते 90 क्विंटल उत्पादन मिळू शकते.
- विशेष म्हणजे या वाणाची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात देखील करता येणार आहे.
- कमीत कमी कालावधीत जास्त चवळीचे उत्पादन या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- जास्त प्रमाणात रोग आणि किडीला बळी पडत नसल्याचा देखील दावा तज्ज्ञांनी केला आहे
Share your comments