मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांनी चार महिन्यांपूर्वी विविध साखर कारखान्यांना उत्पादित केलेला ऊस घातला. परंतु संबंधित कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप मोबदला दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाच्या बोजा वाढत चालला आहे. शिवाय खरीप हंगामही उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने शेतकरी तणावात आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील तात्यासाहेब हरिभाऊ पोळ या शेतकऱ्याने आपला ऊस नगर जिल्ह्यातील वाळकी येथील पियुष शुगर लि. साखर कारखान्यात घातला होता. मराठवाड्यातील ऊस उत्पादकांची देयके येत्या पंधरा दिवसांत न मिळाल्यास सहकार मंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी पाटील यांनी दिला आहे.
शेतकऱ्याने कारखान्यांच्या चेअरमन व संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी मागणी करून सुद्धा उसाची देयक न मिळाल्यामुळे व्हिडिओ लाइव्ह करून विष प्राशन केले. सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती हीच असून त्यांना सुद्धा या मार्गाने जाण्याची वेळ येऊ नये म्हणून कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची रक्कम चुकती करणे आवश्यक आहे.
या राज्यातील सरकार शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार, लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा
यामुळे आता येत्या २५ मे पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची रक्कम जमा करण्यात यावी, अन्यथा सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने जयाजीराव सूर्यवंशी पाटील यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सदाभाऊ खोत मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार
यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पियुष कारखान्याच्या कार्यकारी संचालकासह चेअरमन यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
राज्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार रुपये द्या, शेतकऱ्यांसाठी आयुक्त मैदानात..
16 गोणी कांदा, पट्टी लागली 71 रुपये, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी...
या राज्यातील सरकार शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार, लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा
Share your comments