पतंजली कंपनीही आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रांमध्ये अग्रगण्य कंपनी आहे. सौंदर्यप्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, अन्नधान्य तसेच विविध पदार्थ इत्यादी उत्पादनांमध्ये ही कंपनी अग्रगण्य आहे. आता पतंजली आयुर्वेदिक कंपनीने पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने आणि रूपे च्या माध्यमातून एका अनोख्या क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे.
या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा मिळणार असल्याची माहिती बाबा रामदेव यांनी कार्ड लॉन्चिंग यावेळी दिली. सार्वजनिक क्षेत्रातल्या पंजाब नॅशनल बँकेने रुपेच्या सहकार्यातून तयार केलेल्या पतंजली क्रेडिट कार्डचा बाबा रामदेव यांनी उद्घाटन केले आहे. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पतंजली आयुर्वेद याची उत्पादन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याद्वारे मोठी सूट दिली जाणार आहे.
पतंजली क्रेडीट कार्डची वैशिष्ट्ये
ग्राहकांना या क्रेडिट कार्डचे बिल देण्यासाठी 50 दिवसांचा वेळ दिला जाणार असून जे ग्राहक बिल भरण्यास सक्षम नसतील अशा ग्राहकांना 18 महिन्यात 12 टक्के व्याजासह बिल अदा करू शकतील. या कार्डचा वापर तुमच्या सह तुमच्या कुटुंबीयांना देखील करता येणार आहे. सगळ्या आवश्यक सुविधा या कार्ड च्या माध्यमातून मिळणार आहेत.
जर ग्राहकांनी या कार्डच्या माध्यमातून पतंजली स्टोअर मध्ये शॉपींग केली तर ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. जर 2500 पेक्षा अधिक खरेदी केल्यास ग्राहकांना दोन टक्के कॅशबॅक मिळेल. पण हा कॅश बॅक एका ट्रांजेक्शन वर पन्नास रुपयांपेक्षा अधिक नसेल. कार्ड ऍक्टिव्हेट झाल्यानंतर 300 रिवॉर्ड पॉइंट देखिल ग्राहकांना मिळतील. तसेच यातील प्लॅटिनम कार्ड साठी कोणत्याही प्रकारची जॉइनिंग फि नाही. परंतु यासाठी 500 रुपये वार्षिक शुल्क असून सिलेक्ट क्रेडिट कार्डसाठी जॉइनिंगफि500 रुपये तर वार्षिक शुल्क साडेसातशे रुपये आहे. तसेच या कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना पंजाब नॅशनल बँकेकडून पाच लाख रुपयांचा इन्शुरन्स कव्हर देखील मिळेल
तसेच पतंजली उत्पादने खरेदी केल्यावर ग्राहकांना पाच ते सात टक्क्यांपर्यंत सूट देखील मिळेल आणि इतकेच नाही तर ग्राहक या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही कंपनीचे उत्पादन खरेदी करू शकतात. यातील 60 टक्के क्रेडीट कार्ड ची निर्मिती पतंजली आयुर्वेद तर 40 टक्के कार्ड निर्मिती पंजाब नॅशनल बँक करणार आहे. या काळचे दोन प्रकार असून एक म्हणजे पीएनबी रुपये प्लॅटिनम आणि दुसरे म्हणजे पीएनबी रूपे सिलेक्ट ही होय. हे दोन्ही कार्ड को ब्रँडेड क्रेडिट कार्ड्स कॉन्टॅक्ट लेसआहेत.
Share your comments