भारतातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात हो या पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दूध उत्पादन करून आपली आर्थिक प्रगती उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु या उत्पादित दुधाला बाजारपेठेत चांगला दर मिळावा यासाठी दुधाची मागणी वाढणे आवश्यक आहे
त्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ व मदर डेरी च्या माध्यमातून प्रयत्न करावेत, अशा आशयाची सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी नागपूर येथे केली.नागपूर येथे ॲग्रोव्हिजन 2021 या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनातील दुसऱ्या दिवशी विदर्भात दूध व्यवसायातील संधी या बाबत एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुनील केदार बोलत होते.
याबाबतीत काय म्हणाले नितीन गडकरी?
या परिषदेचे उद्घाटन हे नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री गडकरी म्हणाले की, विदर्भात दुग्ध व्यवसायात वाढ व्हावी यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, मदर डेअरी आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आणि सहकार्याने प्रयत्न सुरू करावेत.
तसेच मदर डेरी च्या माध्यमातुन गावागावातून दूध गोळा करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच येणाऱ्या काळात विदर्भात दूध क्रांती करण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ,मदर डेरी यांनी अधिक प्रभावीपणे काम करावे अशा सूचना श्री गडकरी यांनी यावेळी दिल्या.
दुग्ध व्यवसाय हा शेती उद्योगाशी संबंधित असल्यामुळे अनेक वेळा दुग्धोत्पादक शेतकऱ्यांसोबत थेट संबंध येतो. जर मिनरल वाटर ला जास्तीचा भाव आणि दुधाला कमी भाव अशा आशयाची टिपणी जावे शेतकऱ्यांकडून येते त्यावेळी त्यांना या व्यवसायात आणखी गती घ्यावी, असे कसे म्हणता येईल हा प्रश्न पडतो. त्यामुळे दुधाला उत्तम भाव मिळायला हवा तसेच घरा-घरात दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा वापर वाढला पाहिजे.
यासाठी काही उपाय योजना करणे आवश्यक आहे. या व्यवसायाच्या मधून चार पैसे हातात पडू लागल्यानंतर या व्यवसायाला निश्चितच चांगले दिवस येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी सुनील केदार यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की महाराष्ट्र हा देशामध्ये दुधाची भुकटी तयार करणारा सगळ्यात मोठा भाग असून दुग्ध व्यवसाय हा आता स्थानिक व्यवसाय न राहता जागतिक व्यवसाय झाला आहे. इतकेच नाही तर यामधील नवनव्या तंत्रज्ञानामुळे अनेक मोठमोठ्या उद्योग कंपन्या व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत.( संदर्भ- टीव्ही नाईन मराठी)
Share your comments