2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.त्या दृष्टीने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक प्रकारच्या योजना हाती घेण्यात आल्याआहेत.बऱ्याच योजनांच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते.याचाच एक भाग म्हणूनकिसान क्रेडिट कार्ड च्या धर्तीवर सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे.या लेखात या योजने बद्दल जाणून घेऊ.
पशु किसान क्रेडिट कार्ड योजना
पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचे नियम हे किसान क्रेडिट कार्ड सारखेच आहेत. पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाय,म्हैस, शेळ्या, मेंढी आणि कोंबडीपालनासाठी जास्तीत जास्त तीन लाख रुपयांची रक्कम या योजनेद्वारे मिळू शकणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेच्या माध्यमातून एक लाख 60 हजार रुपयांच्या कर्जासाठी कुठल्याही प्रकारच्या गॅरंटी ची गरज नाही. या योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना दिला जाईल अशा प्रकारचा आश्वासन बँकर्स समितीने केंद्र सरकारला दिले आहे.
कशासाठी किती कर्ज दिले जाईल?
- या योजनेअंतर्गत म्हशीसाठी 60 हजार 249 रुपये देण्याची तरतूद आहे.
- शेळी आणि मेंढी साठी चार हजार 63 रुपये मिळतील.
- अंडी देणाऱ्या कोंबडीसाठी सातशे वीस रुपयांचे कर्ज दिले जाईल.
पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्रता
- अर्जदार हरियाणा राज्यातील कायमचा रहिवासी असावा.
- अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड असावे.
- अर्जदाराकडे मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो गरजेचे आहेत.
या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जांवर बँक सात टक्के व्याजदर आकारते. पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना केवळ चार टक्के व्याज द्यावे लागेल. उरलेल्या तीन टक्क्यांची सूट केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. या योजनेद्वारे मिळणाऱ्या कर्जाची कमाल रक्कम तीन लाखांपर्यंत असते.
अशा पद्धतीने करावा अर्ज
- हरियाणा राज्यातील इच्छुक लाभार्थी या योजनेअंतर्गत पशु किसान क्रेडिट कार्डघेऊ इच्छिता, त्यांनी नजीकच्या बँकेत जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे.
- बँकेत जाताना सोबत सर्वे लागणारी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावे
- अर्ज भरल्यानंतर तुम्हाला केवायसी करावे लागते.
- केवायसी साठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड,वोटर आयडी आणि पासपोर्ट साईज फोटो देणे आवश्यक आहे.
- बँकेकडून केवायसी झाल्यानंतर आणि अर्जाची पडताळणी केल्यानंतर एक महिन्याच्या आत तुम्हाला पशु किसान क्रेडिट कार्ड मिळेल.
( संदर्भ- न्यूज 18 लोकमत)
Share your comments