1. बातम्या

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान पंधरवड्यात 19 लाख शेतकऱ्यांचा सहभाग

मुंबई: राज्यात ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान पंधरवडा’ नुकताच राबविण्यात आला. त्यात 36 हजार मेळावे घेण्यात आले असून सुमारे 19 लाख शेतकऱ्यांनी त्यात सहभाग नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. राज्यात 12 हजार शेती शाळांचे आयोजन केले जात असून त्या माध्यमातून 3 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
राज्यात ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान पंधरवडा’ नुकताच राबविण्यात आला. त्यात 36 हजार मेळावे घेण्यात आले असून सुमारे 19 लाख शेतकऱ्यांनी त्यात सहभाग नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. राज्यात 12 हजार शेती शाळांचे आयोजन केले जात असून त्या माध्यमातून 3 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दि. 25 मे ते 8 जून या काळात हा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीत अधिक सुटसुटीतपणा आणि सुसूत्रता आणण्याकरिता उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवडा राबविला जातो. त्या माध्यमातून अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

जमीन आरोग्यपत्रिका, बियाणे-खते खरेदी करताना घ्यायची काळजी, बीज प्रक्रिया, भाऊसाहेब फुंडकर व रोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजना, ठिबक व तुषार सिंचन इत्यादी अनेक योजनांबद्दल कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या पंधरवड्यात राज्यभरात 36 हजार मेळावे आयोजित करण्यात आले.

कृषी विभागाच्या उत्पादन व उत्पादकता वाढीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्याकरिता शेतीशाळा संकल्पनेवर भर देण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यात 12 हजार शेतीशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये भात, कापूस, सोयाबीन, मका, तूर, ज्वारी, ऊस व हरभरा या पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेतीशाळा आयोजित केल्या जाणार असून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती त्याद्वारे देण्यात येणार आहे, असे विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

English Summary: Participation of 19 lakh farmers in the Unnat Sheti Samrudha Shetakri Campaign Published on: 14 June 2019, 11:48 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters