1. बातम्या

Papaya Crop Insurance Scheme : पपई पीक विमा योजना, वाचा सविस्तर...

या योजनेतंर्गत पपई पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पिक नुकसानीस(आर्थिक)खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Papaya Crop Insurance Update

Papaya Crop Insurance Update

विनयकुमार आवटे

पपई पिकासाठी जळगाव, पुणे, उस्मानाबाद, धुळे, सोलापूर, बीड, औरंगाबाद, नंदुरबार , अहमदनगर,अमरावती, परभणी , जालना , लातूर , वाशिम या १४ अधिसुचित जिल्हा , तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर असलेल्या शासकीय हवामान केंद्र आकडेवारी वरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते.

या योजनेतंर्गत पपई पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पिक नुकसानीस(आर्थिक)खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी - प्रमाणके (ट्रिगर ) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रती हेक्टर )
१) कमी तापमान दि. १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी - सलग ३ दिवस किमान तापमान ८ डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास रुपये १०,५००/-
२) वेगाचा वारा दि. १ फेब्रुवारी ते ३० जून - ४० किमी प्रती तास किंवा त्या पेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्यास रुपये १०,५००/- नुकसान भरपाई देय राहील. मात्र यात वाऱ्यामुळे नुकसान झाल्यास संबंधित विमा धारक शेतकऱ्याने ७२ तासाचे आत नुकसानीची माहिती संबंधित विमा कंपनी / कृषी विभाग यांना कळवणे आवश्यक आहे त्या नंतर वैयक्तिक पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येते
३) जास्त पाऊस व आर्द्रता दि. १५ जून ते ३० सप्टेंबर - सलग ४ दिवस प्रतिदिन पाऊस ४० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास आणि आर्द्रता सलग ५ दिवस ८०% किंवा त्या पेक्षा जास्त राहिल्यास रुपये १४,०००/-
४) गारपीट पासून संरक्षण कालावधी दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल - गारपीट झाल्यास रक्कम रुपये ११,६६७/- च्या मर्यादित वैयक्तिक पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येते मात्र गार पीट झाल्यापासून ७२ तासाचे आत संबंधित विमा कंपनी / मंडल कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे

पपई विमा पिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक :- ३१ ऑक्टोबर २०२३
शेतकर्‍यांसाठी विमा हप्ता
हवामान धोके - विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर - शेतकर्‍यांसाठी विमा हप्ता रुपये प्रती हेक्टर
जास्त तापमान ,जादा तापमान , वेगाचा वारा - ३५,००० - १७५०
गारपीट- ११,६६७ - ५८४

योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा
जिल्हे - विमा कंपनीचे नांव व पत्ता
१)अहमदनगर, अमरावती , सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ, धुळे,पालघर, सोलापुर रत्नागिरी नागपूर, नंदुरबार - रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
२) बीड, औरंगाबाद, अकोला, परभणी, सांगली, वर्धा, ठाणे हिंगोली, सातारा, जालना, लातूर, कोल्हापूर - एचडीएफसी एगो जनरल इन्शुरन्स कं. लि.
३) रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद - भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड

शेतकर्‍यांचा योजनेतील सहभाग
१) या योजनेत अधिसुचित क्षेत्रात, अधिसुचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात. मात्र भाडेकरार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे .
२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करुन सहभाग घेवू शकतात. त्यासाठी , आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पिक लागवड स्वयंघोषणा पत्र , फळबागेचा(Geo Tagging) केलेला फोटो , बँक पासबूक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल.कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
४) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागु असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेवू शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसुल मंडळ अधिसुचित असणे आवश्यक आहे)
५) एक शेतकरी ४ हेक्टर च्या मर्यादेत विमा संरक्षण घेवू शकतो.
६) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ % च्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून म्हणून देण्यात येतो. मात्र विमा हप्ता ३५% पेक्षा जास्त असल्यास शेतकर्‍याला ५% पेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.
७) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसुल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
८) अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.

लेखक - विनयकुमार आवटे – कृषी सहसंचालक (विस्तार व प्रशिक्षण) ,म.रा. पुणे -५
ई-मेल - avinaykumar.30 @gmail.com

English Summary: Papaya Crop Insurance Scheme Update article Published on: 12 October 2023, 02:22 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters