Beed News : २०२४ पर्यंत तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहे. आता घरी बसणार नाही तर मैदानात दिसणार, तसंच आता पडणार नाही पाडणार, मैदानात कोण असेल हे ही तुम्हाला दिसेल, असा इशारा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. बीडमधील दसरा मेळाव्यानिमित्त भाषणावेळी त्या बोलत होत्या. 'भगवान बाबा की जय'च्या जोरदार घोषणाही भाषणावेळी त्यांनी दिल्या. मला कुठलं पद मिळालं म्हणून आलात का? मी तुम्हाला काय दिलंय? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना केला आहे.
भाषणावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या कारखान्यावर छापेमारी झाली त्यावेळी तुम्ही दोन दिवसात ११ कोटी तुम्ही जमा केले. तुम्ही उन्हात बसलात, म्हणून मी सुद्धा स्टेजवरचे उन्हात आहे. मी लोकांचे पैसे घेतले नाही, पण माझ्या लोकांचे आर्शिवाद घेतले. माझा माणूस उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर सावलीत जाऊन बसणाऱ्यांचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही.
पंकजा मुंडे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
१) माझ्या लोकांना न्याय देणे हे माझे कर्तव्य आहे.
२) दुसऱ्या पक्षात जाण्याएवढी मी लेचीपेची नाही. दुसऱ्याच्या मेहनतीचे मी खाणार नाही.
३) मला त्रास देण्याचे घर उन्हात बांधणार
४) लोकांना सरकारकडून खूप अपेक्षा आहे. मी लोकांना फक्त स्वाभिमान देऊ शकते.
५) मी हरले तरी तुमच्या नजरेतून कधीच उतरले नाही.
Share your comments