यावर्षी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या वाढत्या मागणीमुळे बाजारात कापसाच्या भावात तेजी आढळून येत आहे. हमीभावापेक्षा जास्त दराने खरेदी होत असल्याने हमीभाव केंद्र ओस पडत चालली आहेत.
त्यामुळे पणन महासंघाने येत्या 15 तारखेपासून कापूस हमीभाव केंद्र टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोना काळात असलेल्या लॉक डाऊन मध्ये कापड उद्योगाला सूट दिल्याने कापसाची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी वाढली परंतु त्या मागणीच्या तुलनेत कापसाचा पुरवठा कमी राहिला. त्यामुळे कापसाला हमीभावापेक्षा जास्त किंमत मिळाल्याने सी सी आय तसेच पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांवर कापसाची आवक अत्यंत कमी होत आहे. जर आजवरच्या सीसीआय आणि पणन महासंघाचे खरेदीचा विचार केला तर सीसीआई ने आज पर्यंत 47 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आणि पणन महासंघाने 36 लाख क्विंटल खरेदी केली आहे.
Share your comments