गेल्या काही दिवासांपासून कापसाचे दर चांगलेच वधारले आहेत. यामुळे भारताचा शेजारील देश पाकिस्तान देश चिंतेत पडला आहे. पाकिस्तानमध्ये लांब धाग्याच्या कापसाचे दर १६ हजार ७०० रुपये प्रतिमण झाले आहेत. स्थानिक बाजारात दर १५ हजार ९०० प्रतिमणावर पोहचले आहेत.
तर फुटी आणि बलुचिस्तानच्या कापसाचे दर हे ८ हजार २०० रुपये प्रतिमणावर पोहोचले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी सरकारने देशांतर्गत कापूस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि सरकीवरील १७ टक्के विक्री शुल्क रद्द करावेत, अशी मागणी पाकिस्तानी कापूस गिरणी असोसिएशन आणि पाकिस्तान कापड मिल असोसिएशनने केली आहे. मागील आठवड्यात सुतगिरण्या खरेदी उतरलेल्या असल्याने दरात वाढीचा कल कायम होता. तर कापड उद्योग मात्र वाढत्या दरामुळे साठा करून ठेवण्यास इच्छुक दिसत नाही. सध्या न्यूयार्क कॉटन एक्सेंजवर दरातील चढ-उतारानंतर कापसाचे वायदे १.१८ सेंट प्रतिपाउंडर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापासातील तेजी कायम असून भारतातही दर वाढलेले आहेत.
हेही वाचा : कापूस उत्पादक राज्यांसाठी चांगली बातमी; GEAC कडून 11 कापूस संकरित जातींची शिफारस
भारतात कापसाचे दर ६७ हजार प्रतिखंडीवर आहेत. पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत होत असतानाही कापसाचे दर तेजीत आहेत. रुपयाचे अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाल्यास सूतगिरण्या कापूस आयातीसाठी पुढ येतील. पाकिस्तानमध्ये कापासाचे उत्पादन घटल्याने देशांतर्गत कापड उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला कापूस आयात करावी लागणार आहे. मात्र दर वाढल्याने उद्योगाने चिंता व्यक्त केली आहे. सरकारने धोरण आखून कापड उद्योगाला विस्तार केला आहे.
पाकिस्तानात आहेत वेगवेगळे दर
सिंध प्रांतात कापसाचे दर गुणवत्तेप्रमाणे सरासरी १२ हजार ५०० ते १६ हजार ७०० रुपये प्रतिमण आहेत. फुट्टी कापसाचे दर साडेचार हजार ते सात हजार रुपये प्रति ४० किलो आहेत. तर सरकीचे दर १३५० ते दर हजार रुपये प्रतिमणावर आहेत. पंजाबमध्ये कापसाचे दर सरासरी १४ हजार ४०० ते १६ हजार ५०० पाकिस्तानी रुपये प्रतिमण आहेत. तर कच्चा कापसाचे दर ५ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आहेत. पंजाब प्रांतात सकीचे दर १५० ते २१०० रुपये प्रतिमण आहेत. बुलचिस्तान प्रांतात कापसाचे दर सरासरी १३ हजार ७०० ते १६ हजार पाकिस्तानी रुपये प्रतिमणावर आहेत. येथे कच्चा कापसाचे दर ६ हजार २०० ते ८ हजार २०० रुपये प्रति ४० रुपये आणि सरकीचे दर प्रतिमण १६०० ते २२०० रुपयांवर आहेत.
महाराष्ट्रातही कापसाचे दर तेजीत
बाहेरच्या राज्यातील व्यापारी पांढरे सोने घेण्यासाठी खानदेशात पोहोचले आहेत. सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी धुळे, पाचोडा, चोपडा, जामनेर येथील शेतकऱ्यांना कापसाने आर्थिक आधार दिला आहे. प्रति क्विंटल ला ८२५० असा दर तेथील केंद्रावर भेटत आहे. खानदेशात दिवसाआड सुमारे १ लाख क्विंटल कापसाची आवक होते. खानदेशात जिनिंग प्रक्रिया सुरू झाल्याने कापसाला चांगला दर मिळाला आहे. डिसेंबरपर्यंत कापसाचे दर स्थित राहतील आणि त्यानंतर यामध्ये सुधारणा होईल. शेतकरी हळुवार पद्धतीने कापूस विक्रीसाठी आणत आहेत.
उत्पादन कमी अन् मागणी अधिक:-
यावर्षी कापसाचे उत्पादन कमी असल्यामुळे तोडणीला सुरुवात होताच मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली. खानदेशात कापूस खरेदीसाठी गुजरात तसेच मध्यप्रदेश मधील एजंट आले आहेत. तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल या भागात कापसाला चांगल्या प्रमाणत दर मिळत आहे.
Share your comments