1. बातम्या

पी. आर. पोटे-पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार धेनू ॲपद्वारे डिजिटल उद्यमीता प्रशिक्षण...

पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय व धेनू ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२८,२९ आणि ३१ ऑगस्ट या दरम्यान तीन दिवसीय ऑनलाईन डिजिटल उद्यमिता प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणामध्ये कृषिच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्योजकतेची गोडी निर्माण व्हावी व आपल्या शिक्षणाचा उद्योजकता विकासामध्ये फायदा करून घेता यावा, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Dhenu app

Dhenu app

पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय व धेनू ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२८,२९ आणि ३१ ऑगस्ट या दरम्यान तीन दिवसीय ऑनलाईन डिजिटल उद्यमिता प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणामध्ये कृषिच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्योजकतेची गोडी निर्माण व्हावी व आपल्या शिक्षणाचा उद्योजकता विकासामध्ये फायदा करून घेता यावा, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.

बीएससी कृषीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतेक तरुण हे ग्रामीण भागामध्ये कृषी सेवा केंद्र चालू करतात परंतु, या कृषी केंद्रासाठी गुंतवणूकही फार मोठ्या प्रमाणावर लागते त्यामुळे काही तरुणांची इच्छा असतानाही गुंतवणुकी अभावी त्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही.

अशा स्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढती महागाई व बेरोजगारी लक्षात घेता, सुशिक्षित तरुणांच्या नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या उद्देशाने धेनू टेक सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना तसेच बेरोजगार तरुणांना उद्योजकतेची संधी निर्माण व्हावी व आपले कृषी सेवा केंद्राचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी धेनू ॲपचा डिजिमार्ट प्लॅटफॉर्म म्हणजेच कृषीचे ऑनलाईन दुकान उपलब्ध करून दिले आहे.

या डिजिमार्टच्या माध्यमातून प्रत्येक होतकरू तरुण अगदी नाममात्र शुल्कामध्ये आपला व्यवसाय रजिस्टर करून डिजिटली घरबसल्या उत्पादने विक्रीच्या सेवा ग्राहकांना देऊन अधिकचा नफा कमवू शकतो यामध्ये त्या व्यावसायिकाला कोणतेही अधिकची आर्थिक गुंतवणूक करावी लागत नाही तसेच उत्पादनाच्या विक्रीसाठी ग्राहकांची वाटही बघावी लागत नाही.

पंजाबचे पशुपालक स्वच्छ व निर्भळ दूध उत्पादनासाठी काय करतात? जाणून घ्या..

अशी डिजीमार्टद्वारे व्यवसाय करण्याची संधी या प्रशिक्षणामधून माध्यमातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. उच्च शिक्षण सुरु असताना किंवा शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना नोकरी न करता व्यावसायिक होण्याच्या विविध संधी आता उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याची व व्यवसाय करण्याची जिद्द आहे या विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण खूप फायदेशीर ठरणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या डिजिटल उद्यमिता प्रशिक्षणामध्ये डिजिटल उद्योजक, डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल प्रमोशन याशिवाय डिजिटल टेक्नॉलॉजी व त्याचा वापर यांसारख्या विविध बाबी हे प्रॅक्टिकली अनुभवायला व पाहायला मिळणार आहेत.

पशुसंवर्धन विभाग व धेनू ॲप आयोजित, दुग्धव्यवसायातील नवतंत्रज्ञानातून सामाजिक बदल कार्यशाळा संपन्न...

तसेच या प्रशिक्षणामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी उत्कृष्टरित्या सहभाग नोंदवतील अशा विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व सहा हजार रुपये किमतीचा डिजिमार्ट प्लॅन व भविष्यात नोकरीच्या संधी तसेच पुढील उद्योजकीय ज्ञान प्राप्त होण्याची संधी देखील मिळणार आहे.

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात धेनूच्या डिजिटल उद्यमिता प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद
तेरणा इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार धेनू ॲपद्वारे डिजिटल उद्योमीता प्रशिक्षण...

English Summary: P. R. Students Pote-Patil Agricultural College will get digital entrepreneurship training through Dhenu app... Published on: 28 August 2023, 09:42 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters