1. बातम्या

राज्यातील साखर कारखाने उभारणार ऑक्सीजन प्रकल्प

KJ Maharashtra
KJ Maharashtra
राज्यातील साखर कारखाने उभारणार ऑक्सीजन प्रकल्प

राज्यातील साखर कारखाने उभारणार ऑक्सीजन प्रकल्प

साखर कारखान्यातील सहवीजनिर्मिती व आसवनी या प्रकल्पामधून मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करता येईल, असे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व कारखान्यांना ऑक्सीजन निर्मिती व पुरवठा करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर ऑफ जनरल शिवाजीराव देशमुख यांनी दिली.

सध्या महाराष्ट्र मध्ये कोरोना च्या गंभीर परिस्थितीमुळे बहुसंख्य ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. सध्या स्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी असे निर्देशित केले आहे की, ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम अजून चालू आहे आणि ज्यांचा सहवीज निर्मिती व आसवनी प्रकल्प कार्यरत आहे. अशा प्रकल्पांमधील मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व च्या कारखान्याचा गाळप हंगाम संपलेला आहे,  अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्य क्षमतेसाठी ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड  सेंटरला करावा असे पत्रकात नमूद केले आहे.

 

साखर कारखान्यांना कसा बनवता येईल ऑक्सिजन

 साखर कारखान्यामध्ये ज्या आसवनी प्रकल्प असतात तिथे इथेनॉल शुद्ध करण्याचा आणि कार्बन डाय-ऑक्साइड वेगळ करण्याचा अनुभव आहे. त्याकरिता फक्त ऑक्सीजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारायचा आहे.  जर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करायचा असल्यास त्यासाठी वाफ  आणि विजेची गरज असते. त्यासंदर्भात व्याक्युम प्रेशर स्विग अडसॉरपशन प्रोसेसिंग या प्रकल्पानुसार कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीच्या प्लांट उभारावेत.  असे शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters