कोरोनामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे जे की मागील वर्षी लॉकडॉन पडल्यामुळे शेतकऱ्यांचा माल तसाच पडून राहिला आणि त्यांना खूप मोठे नुकसान झाले तर आत्ता पाहायला गेले तर अतिवृष्टीमुळे काही भागात शेतकऱ्यांची पिके मरून गेली त्यामुळे शेतकरी वर्ग खूप अडचणीत आला. तसेच आत्ता शेतकऱ्यांच्या बाबतीत अशी घटना घडलेली आहे ज्याने तुमचा जीव व्याकुळ होईल, ही घटना आहे नंदुरबार जिल्ह्यातील.
एका रात्रीत १६०० झाडे कापल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान:
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामधील बोरद या गावात एक अनोखी घटना घडलेली आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा संताप झालेला आहे.तिथे एका अज्ञात व्यक्तीने परिपक्व झालेल्या पपईची १६०० झाडे कापून टाकलेली आहेत आणि याच धक्का त्या शेत मालकाला बसलेला आहे.ही घटना होण्याआधी दहा दिवसांपूर्वी त्याच क्षेत्रातील जवळपास ५० पपई ची झाडे कापून टाकलेली आहेत आणि यानंतर लगेच एका रात्रीत १६०० झाडे कापल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी लवकरात लकवर तपास होयला पाहिजे अशी मागणी तेथील शेतकरी करत आहेत.
हेही वाचा:30 ऑगस्ट पासून वाढणार राज्यात पावसाचा जोर
रक्ताचं पाणी करुन जगवलेल्या बागेच एका रात्रीत सत्यानाश:-
बोरद शिवाऱ्यात दत्तू रोहिदास पाटील या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर क्षेत्रात पपई ची बाग लावलेली होती. सकाळी पाटील हे आपल्या मजुरांना घेऊन शेतात निघाले होते आणि तिथे गेल्यावर आपल्या बागेवर कोयता चालवलेला दिसल्याने त्यांना धक्का बसला.जे की मजूर वर्ग सुद्धा एवढ्या खूप घाबरून गेला. अचानक एका रात्रीत जर १६०० झाडे कापून टाकली तर त्या शेतामध्ये गेलेला जो लागवडी चा खर्च आहे तो सुद्धा वाया गेला आणि त्यामुळे पाटील हे शेतकरी खूप संकटात आले आहेत.
आधीच पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे आणि त्यानंतर असा उदयोग झाल्यामुळे शेतकरी खूप संकटात आलेले आहेत. दिवसभर रक्ताचा पाणी करून शेतकऱ्याने बाग जगवली होती मात्र एका रात्रीत अज्ञात व्यक्तीने बागेचा सत्यानाश केला जे की १ झाड न्हवते तर पूर्ण तीन एकर बागेत १६०० झाडे होती त्यावर कोयता चालवला आहे. तेथील शेतकऱ्यांची हीच मागणी आहे की जास्तीत जास्त गस्त वाढवावा मात्र तेथील प्रशासन दुर्लक्ष देत असल्याचे काही चित्र समोर आलेले आहे. तेथील आसपासच्या भागामध्ये पीक कापून टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग खूप घाबरलेला आहे.
Share your comments