MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

अवकाळी, गारपीट आणि वादळावर मात करत फळांचा "राजा" या वर्षीही जोमात

यंदा निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या चांगलाच मुळावर उठला होता. त्यात खरिपासह रब्बी पिकांना मोठा फटका बसला. मात्र, फळांच्या राज्या ही संकटे झेलीत आपला रुबाब कायम ठेवला आहे.

Mango

Mango

यंदा निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या चांगलाच मुळावर उठला होता. त्यात खरिपासह रब्बी पिकांना मोठा फटका बसला. मात्र, फळांच्या राज्या ही संकटे झेलीत आपला रुबाब कायम ठेवला आहे. यंदाचा आंबा (Mango) हंगाम नेहमी प्रमाणे चांगलाच जोमात असणार आहे. सध्या मुंबई APMC फळ मार्केटमध्ये जवळपास ६६०० पेटी आंबा आवक झाली आहे.

राज्यातील हापूस ४६०० पेटी तर कर्नाटक आंबा ११५० पेटी आहे. सध्या चार ते पाच डझनाच्या पेटीला जवळपास ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर असल्याचे आंबा व्यापारी (Mango trader) नरहरी मारुती शेळके यांनी सांगितले. राज्यातील कोकण आंब्याचे सर्वात मोठे आगार असून येथील सर्वच जिल्हांमध्ये आंब्याच्या हापूस जातीचा बोलबाला आहे.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी (Sindhudurg and Ratnagiri) जिल्ह्यांमध्ये दोन वेळा अचानक निर्माण झालेल्या ढगाळ आणि पावसाच्या वातावरणामुळे जानेवारी व फेब्रुवारी मध्ये येणाऱ्या आंब्याचे प्रमाण कमी झाले आहे. या काळात झाडांचा मोहोर बहरलाच नसल्याने जवळपास ७० टक्के आंबा कमी झाला असून ३० टक्केच आंबा या दिवसांमध्ये येत आहे. पुढील महिन्यात १० तारखेपासून भरपूर आंबा मुंबई APMC मार्केटला येणार आहे.

हेही वाचा : कलिंगड आणि टरबुजाला "अच्छे दिन"; भावात तब्बल इतकी वाढ

ब्रेकिंग: ...तर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा ऊर्जामंत्र्यांचा इशारा

सध्या झाडाचे आंबे पाहता येत्या दहा दिवसांमध्ये अधिक आंबे निघणार असल्याचे शेतकरी सांगत आहे. तर १५ मार्च पासून कोकणातील सर्वच जिल्ह्यांमधील आंबा बाजारपेठेत येऊन धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरवर्षी प्रमाणे सिंधुदुर्ग, देवगड, रत्नागिरी, अलिबाग आणि शेवटी जुन्नर हापूस बाजारपेठेत येण्याचा क्रम असतो. परंतू मागील काही महिन्यांपासून सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे आणि अवकाळी पावसामुळे सुरुवातीचा बहर गळून पडला होता.

महत्त्वाची बातमी : राज्यात पाच ते सहा लाख टन उसाचे गाळप शिल्लक; कारखाने बंद होण्याच्या मार्गावर, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

English Summary: Overcoming untimely, hailstorms and storms, the "king" of fruits is still alive this year Published on: 28 February 2022, 05:30 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters