1. बातम्या

पुढच्या पाच वर्षात अमूलने ठेवले एवढ्या वार्षिक उलाढालीचे लक्ष

KJ Staff
KJ Staff


पुणे : भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या अमूलने २०२४- २०२५ पर्यंत आपली वार्षिक उलाढाल तब्ब्ल १ लाख कोटीवर नेण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. अमूल अफाट गुजरात राज्य सहकारी दुघ उतपादक संघ हा भारतातील सहकारी क्षेत्राचा चेहरा आहे. अमूलने गुजरात आणि शेजारील राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणला आहे.

अमूलच्या नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक बैठकीत, यावर्षी संघाची एकूण उलाढाल ५२ हजार कोटींवर गेल्याची घोषणा करण्यात आली. या बैठकीत अमूलने आपली वार्षिक उलाढाल १ लाख कोटींवर नेण्याचा निर्धार व्यक्त  केला. याप्रसंगी बोलताना संघाचे उपाध्यक्ष, जेठाभाई भारवाड म्हणाले की, मागच्या २१ वर्षांपासून भारताने दूध उत्पादनातील वाढ कायम ठेवली आहे. जेव्हा जगाचे दुध उत्पादन २% ने वाढत होते तेव्हा भारताचे उत्पादन ५% ने वाढत होते. भारत हा जगातील ५०% दूध उत्पादन करतो. देशात उत्पादित होणाऱ्या दुधाची किंमत जवळजवळ ८ लाख कोटी असून ही देशात पिकणाऱ्या डाळी आणि धान्य यांची एकूण किंमत आहे.

भारत सरकारने नुकताच दूध उत्पादक शेतकरी, सहकारी संघ यांसाठी १५  हजार कोटी रुपयांचा राष्ट्रीय विकास निधी स्थापन केला आहे. याचा फायदा दूध उतपादन साखळीतील प्रत्येक घटकाला होईल अशी आशा आहे.

अमूलची हनुमानझेप

देशातील सर्वात मोठी सहकारी दूध संस्था असलेल्या गुजरात  राज्य सहकारी दूध उत्पादकसंघ अर्थ अमूलने २०१९- २० या आर्थिक वर्षात हनुमान उडी घेतली असून अमूलची एकूण उलढाल ५२ हजार कोटी रुपये झाली आहे.  ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण विक्रीची उलाढाल ३८ हजार कोटी झाली आहे. अमूलने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार मागच्या दहा वर्षांमध्ये या अमूलने दूध संकलनात मोठी झेप घेतली असून २००९ मध्ये दूध संकलन दर दिवशी ९० लाख टन होते ते आता २०१९ -२० मध्ये दर दिवशी २१५ लाख लीटर झाले आहे.  अमूल हा देशातील सर्वात मोठा दुधाचा ब्रॅड आहे. अमूल अनेक  राज्यातून दुधाचे संकलन करते. लोकडाऊनच्या काळात अमूलने आधीचे ३५ लाख लिटर दूध खरेदी करून शेतकऱ्यांना ८०० कोटी मिळवून दिल्याचा दावा केला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters