1. बातम्या

जुन्नर-आंबेगाव आंबा महोत्सवाचे आयोजन

मुंबई: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जुन्नर-आंबेगाव येथे 'जुन्नर -आंबेगाव आंबा महोत्सव 2019' चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पर्यटकांना कृषी पर्यटनाची संधी निर्माण होणार आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जुन्नर-आंबेगाव येथे 'जुन्नर -आंबेगाव आंबा महोत्सव 2019' चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पर्यटकांना कृषी पर्यटनाची संधी निर्माण होणार आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होऊन आंब्याच्या बागेत थेट जाऊन आंबे खरेदी करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच स्थानिकांनाही पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती होणार असून कृषी पर्यटन व ग्रामीण अर्थव्यवस्थेला या महोत्सवाच्या माध्यमातून बळकटी मिळणार असल्याची माहिती पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास, माळशेज घाट यांचे वतीने दिनांक 7, 8, 9 जून तसेच 15, 16 जून 2019 रोजी 'जुन्नर-आंबेगाव आंबा महोत्सव 2019' चे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील जुन्नर, येणेरे, गिरवली, शिनोली, पारुंडे, निरगुडे, पिंपळगाव, सुपेधर आणि गंगापुर या ठिकाणी महोत्सव कालावधीत रोज सकाळी 10.00 ते 5.30 या वेळेत हा महोत्सव होणार आहे.

आंबा म्हटल्यावर आपल्याला रत्नागिरी, देवगड आठवते. रत्नागिरी, देवगड येथील आंबे प्रसिद्ध असले तरी त्याच गोडीचे आणि गुणवत्तेचे आंबे पुणे जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यात होतात. जुन्नर-आंबेगाव येथील आंब्यांचे वैशिष्ट्य म्हणजे- या भागातील विविध आंब्यांचा आकार, रंग, सुगंध, चव ही वैशिष्ट्ये कोकणापेक्षाही थोडी वेगळी आहेत. येथील प्रदूषणमुक्त वातावरण, नैसर्गिककरित्या उत्पादन, जमिन, पाणी हे त्यामागील कारण आहे. फळांवर नैसर्गिक मऊसर मुलामा, पातळ साल, आकाराने पातळ, लहान कोय याबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण आंबटगोड चव ही यांची खास वैशिष्ट्ये आहेत. मात्र प्रसिद्धीअभवी या गोष्टीची माहिती  फार झालेली नाही. ही उणीव या महोत्सवाच्या निमित्ताने दूर होईल असेही पर्यटनमंत्री श्री. रावल म्हणाले.

आंब्याच्या बागेत जाऊन आंब्याची बाग पाहण्याबरोबरच थेट शेतकऱ्यांकडून आंबे खेरदी करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्यामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम होत असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, माळशेज घाट पर्यटक निवास, जिल्हा परिषद कृषी  विभाग पुणे, पंचायत समिती जुन्नर व आंबेगाव, कृषी विभाग, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामधील शेतकरी यांच्यातर्फे दिनांक 7, 8, 9 आणि 15, 16 जून 2019 रोजी जुन्नर व आंबेगाव तालुका येथे 'जुन्नर-आंबेगांव आंबा महोत्सव 2019' आयोजित करण्यात आले आहे.

सदर महोत्सवामधे पर्यटकांना आंब्याची बाग कशी असते, शेतकरी त्याचे उत्पादन कसे घेतात, आंब्याचे वेगवेगळे प्रकार कोणते,अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबरोबरच आंब्याच्या प्रत्यक्ष बागेत जाऊन चव चाखता येईल. तसेच आंब्याच्या बागेत भोजनाचा आस्वाद व आनंद घेता येणार आहे. याशिवाय थेट शेताच्या बांधावरून आंब्याची खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार म्हणून या आंबा महोत्सवात पर्यटकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहिती करिता संपर्क क्रमांक:

  • श्री. विष्णू गाडेकर (व्यवस्थापक, पर्यटक निवास, माळशेजघाट 7768036332/9822043175)           
  • श्री. निलेश बोऱ्हाडे (मु.पो. शिनोली, ता.आंबेगांव, जि. पुणे 9922847847)
  • श्री. महेश शेजवळ (मु. पो. सुपेधर, ता. आंबेगांव, जि. पुणे 9922868333)
  • श्री. गणेश हगवणे (मु.पो. गिरवली, ता. आंबेगांव, जि. पुणे 8600880111)
  • श्री. विजय येवले (मु. पो. गंगापुर, ता. आंबेगांव, जि. पुणे 9420174065)
  • श्री. मिलींद अवटे (मु. पो. गंगापुर, ता. आंबेगांव, जि. पुणे 9767102703)
  • श्री. राजेंद्र पवार (मु.पो. पारूंडे, ता. जुन्नर, जि. पुणे 9975571007)

 

English Summary: Organizing of Junnar-Ambegaon Mango Festival Published on: 04 June 2019, 07:08 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters