आज जागतिक विज्ञान दिवस निमित्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शाखा, स्टुडट फॉर डेवलपमेंट तसेच Environment and forest education centre, AGRIVISION यांच्या मदतीने कृषि विद्यापीठ शाखेत पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर पक्षी निरीक्षण कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक म्हणुन उदय वझे तसेच देवेंद्र तेलकर लाभले होते. पक्षी निरीक्षण कार्यक्रमास सुरुवात ही विद्यापीठ कॅन्टीन पासून सुरुवात झाली.
सर्व प्रथम मार्गदर्शक म्हणुन लाभलेले उदय यांनी पक्षी जगा बद्दल सुंदर प्राथमिक माहिती दिली त्यांनी जगात सुमारे 6000 पेक्षा जास्त पक्षी वास्तवात आहे त्या मध्ये भारतात सुमारे 1200 पेक्षा जास्त तर अकोला या शहरात सुमारे 360 - 380 प्रकारचे पक्षी आढळून येतात. या नंतर सुमारे 50 विद्यार्थी मित्रांची टीम निघाली पक्षी निरीक्षण करायला त्यांना ही पहिली वेळ असेल त्यांच्यात कुतूहलतेची भावना होती त्याचा प्रतेक प्रश्नाची उत्तरे लाभलेले मान्यवर काही वेळात देत होते.
मोर, बबुल, मैना आणि काही नावे तर सर्वाना पहिल्यांदा कळली. काही पक्षी अर्थात Brain fever ( मान्सून वेळी पेरते व्हा) असा नाद करणारा प्राणी जो कृषि घटककाशी कश्या प्रकारे जुळला आहे हे सुधा विद्यार्थी मित्रांना माहिती घडली. पक्षी निरीक्षण नव्हे तर विद्यापीठात जैवविविधता किती आहे हे डॉ. हर्षवर्धन देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून दिले काही परदेशी मधून आणलेली झाडाची ओळख त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवून दिली.
हळू हळू सर्व पक्षी निरीक्षण मोर्चा टेकडी सर करत PGI, कॅम्पस इथे पोहोचला तिथे त्यांना सुतार पक्षाच्या निरीक्षक करायला मिळाले. आता आज जागतिक विज्ञान दिवस तेव्हा हे पक्षी कश्या प्रकारे आपले जिवन पद्धती जगतात, हे कश्या प्रकारे संपूर्ण जंगल, परिसर स्वच्छ कशे करून आणतात, सुतार पक्षी याचे यांची शरीर रचना इतके सुंदर माहिती विद्यार्थी मित्रांना लाभली.
विद्यार्थी मित्रांना आज पक्षी निरीक्षण, जैवविविधता दर्शन व त्या मागील विज्ञान पाहायला अनुभवाला मिळाले. शेवटी दोन्ही मार्गदर्शक यांनी एक युक्ती लढवली व एक प्रश्ण मंजुषा स्पर्धा आयोजित केली. सर्व विद्यार्थी 10 गटात विभागले गेले आणि सुरवात झाली एक उजळनीची. सुमारे 10 राऊंड घेण्यात आले आणि त्यात 2 गटात टाय झाली. आणि शेवटी प्रश्ण अवघड करत मान्यवरांनी गट क्रमांक G ला विजेते घोषित केले.
पक्षी निरीक्षण कार्यक्रमास शेवटी दोन्ही मान्यवरांचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दैनंदिनी देवून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळेस मुख्य मार्गदर्शक उदय वझे, आणि देवेंद्र तेलकर हे होते यावेळेस SFD प्रांत प्रमुख प्रा.हर्षवर्धन देशमुख, प्रांत सहमंत्री मनीष फाटे, प्रांत अग्रिव्हिजन संयोजिका कु.एकता राजपूत, विद्यापीठ अध्यक्ष निखिल यादव, विद्यापीठ मंत्री सुहास मोरे आणि अन्य 50 कार्यकर्ते उपस्थित होते.
Share your comments