सध्या राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरू झाला असून कारखाने सुरू झाले आहेत. यामुळे उसाला किती दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखान्यांना इशारा दिला आहे.
असे असताना आता येत्या बुधवारी सणसर येथे सायंकाळी भव्य ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी माहिती दिली आहे. यामध्ये उसाला एफआरपी मिळाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे.
तसेच मागील हंगामातील एफआरपी अधिक 200 रुपये, चालू हंगामातील एफआरपी अधिक 350 रुपये, वजन काट्यात पारदर्शकता अशा प्रमुख मागण्या आहेत. यामुळे आता शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
सूतगिरणीच्या निवडणुकीतून बड्या नेत्यांची माघार, निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष..
तसेच साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, सतीश काकडे, यावेळी उपस्थित राहणार आहेत. ऊस दरासाठी राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत राज्य सरकारला इशारा दिला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
आंदोलनाला यश! पहिली उचल 3100, कारखान्याचे धुराडे सुरू..
शेतकऱ्यांनीही भविष्याचे नियोजन करावे! फक्त 200 रुपयांची गुंतवणूक आणि दरमहा 3000 पेन्शन
आता दूध उत्पादन वाढीसाठी आनंद पॅटर्न राबवणार, गोकुळची घोषणा..
Share your comments