आता शेतकरी बांधव जैविक शेतीकडे वळताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात देखील जैविक शेती मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. जिल्ह्यातील कसमादे अर्थात कळवण सटाणा मालेगाव देवळा या भागातील जैविक शेतीचे प्रमाण कमालीचे वाढताना दिसत आहे. त्यामुळे शेणखताची मागणी ही दिवसेंदिवस वाढतच आहे, नुकतेच रासायनिक खतांच्या किमतीत अवाजवी दरवाढ पाहायला मिळाली याचाच परिणाम म्हणून शेणखताच्या किमती देखील कमालीची वाढ दिसून येत आहे. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी शेतकरी आता रासायनिक खतांचा वापर टाळताना दिसत आहेत, जमिनीची पोषक घटकांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी बांधव आता शेणखत वापरू लागले आहेत
आणि आता शेणखताचा देखील चांगलाच भाव वाढला आहे. शेतकरी बांधवांनी शेणखताचा मोठा वापर सुरू केला आहे त्यामुळे जास्तीचे पैसे मोजूनही शेणखत आता मिळत नाहीय. गेल्या दशकापासून जास्तीच्या उत्पादनाच्या हव्यासापोटी शेतकरी बांधवांनी अधिकचे रासायनिक खत जमिनीत मिसळले त्यामुळे जमिनीची पोत खालावली गेली, आधी रासायनिक खताचा शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळाला मात्र आता याचा तोटा बघायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी बांधव पुनश्च आपल्या काळ्या आईला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जैविक शेतीकडे वळताना दिसत आहेत.
एक ट्रॉली खत सात हजाराला
शेणखताला सध्या सोन्यासारखा भाव मिळताना दिसत आहे. सध्या शेणखताची एक ट्रॉली सहा हजार रुपयाला मिळत आहे, शेणखत वावरात टाके पर्यंत एका ट्रॉली ला सात हजार रुपये पर्यंत खर्च जाऊन पोहचत आहे. शेतकरी बांधवांना अधिक उत्पादनासाठी शेणखताचा सर्रास वापर सुरू केला आहे, त्यामुळे शेणखताला चांगलीच मागणी बघायला मिळत आहे. याचाच परिणाम हा त्याच्या दरावर देखील बघायला मिळत आहे.
असे करा सेंद्रिय खताची निर्मिती
जर आपल्यालाही शेणखताचा वापर आपल्या जमिनीत करायचा असेल पण शेणखताच्या वाढत्या किमतीमुळे परेशान असाल तर काळजी करू नका आपण आपल्याच वावरात शेणखतासारखेच सेंद्रिय खत तयार करू शकता यासाठी आपल्या शेतात जे पिक काढणी करून झालेले असते त्याचे अवशेष म्हणजे कडबा, पाचट इत्यादी आपण ते जाळून न टाकता सरळ वावरात दफन करावे यापासून ऑटोमॅटिक सेंद्रिय खत जमिनीत तयार होते. यामुळे साहजिकच आपला हजारोंचा खर्च वाचणार आहे. सेंद्रिय खतामुळे उत्पादन तर वाढतेच शिवाय उत्पादन हे दर्जेदार असते त्यामुळे सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे असे कथन विशेषज्ञ करत आहेत.
Share your comments