Nashik- नाशिक जिल्ह्यात द्राक्ष काढणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. काही द्राक्ष बागायतदार (Grape Growers) यांची द्राक्षाची हार्वेस्टिंग (Grape harvesting) पूर्ण झाली असून ते आता खरड छाटणी करत आहेत. काही द्राक्ष बागायतदार खरड छाटणी झाल्यानंतर शेणखत टाकण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे तसेच डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आता डाळिंबचा बहार देखील शेतकरी बांधव धरण्याच्या तयारीत आहेत यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी (Pomegranate growers) सध्या डाळिंबाच्या झाडाला शेणखत टाकण्यासाठी लगबग करत आहेत.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात डाळिंबाची शेती (pomegranate farming) केली जाते या तालुक्यातील शेतकरी मोठ्याप्रमाणात डाळिंबाच्या मृग बहारचे उत्पादन घेत असतात. यामुळे मृग बहारातील डाळिंबांना सद्या शेणखत (Organic Fertilizer) टाकण्यास सुरुवात केली गेली आहे.
शेणखताचा दिवसेंदिवस वापर वाढत असल्याने जिल्ह्यात शेणखताचा मोठा तुटवडा आहे. यामुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. शेणखताचा एका ट्रकसाठी शेतकऱ्यांना सध्या 26 हजार रुपये मोजावे लागत आहेत. नाशिक जिल्ह्यातून मुंबईला भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रक मध्ये शेणखत नाशिकमध्ये परत आणले जात आहे. असे सांगितले जात आहे की अवघ्या पंधरा दिवसात नाशिक मध्ये वीस हजाराहून अधिक शेणखताच्या ट्रक द्राक्ष बागायतदारांनी मागवल्या आहेत. यामुळे शेणखताला अधिक भाव असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : Custerd Apple Variety : भारतातील सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या सीताफळच्या जाती ; वाचा याविषयी
शेणखत झाले महाग- गेल्या वर्षी शेणखत 20 ते 22 हजार रुपये प्रतिट्रक या दराने शेतकऱ्यांना मिळत होते. आता यात पाच ते सहा हजारांनी वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी राजाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शेणखताचा भावाला असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार असल्याचे शेतकरी बांधव सांगत आहेत. सध्या शेणखताला तब्बल 26 हजार रुपये प्रतिट्रक असा दर मिळत आहे. शेण खताचे भाव वाढण्याचे दोन प्रमुख कारणे सांगितली आहेत ते म्हणजे वाढती मागणी व डिझेलचे दर.
डिझेलचे दर राज्यात शंभरच्या वर आहेत यामुळे वाहतूक खर्च वाढला असल्याने शेणखताच्या दरात वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे. दर चढलेले असले तरी खरड छाटणी केलेल्या द्राक्षबागांना शेणखत आवश्यक असल्याने शेतकरी चढ्या दराने शेणखताची खरेदी करून द्राक्ष बागांना लावत आहेत. यामुळे निश्चितच द्राक्ष उत्पादक शेतकर्यांचा तसेच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.
शेणखत वापरण्याचे फायदेचं फायदे- शेणखत हे एक प्रमुख सेंद्रिय खत आहे. पूर्वी शेतीमध्ये शेणखतात वापर होत होता. मात्र उत्पादन वाढीचे अनुषंगाने शेतकरी बांधवांनी शेणखताकडे दुर्लक्ष करत रासायनिक खतांचा सहारा घेतला आणि जमिनीचा पोत बिघडला.
मात्र आता पुन्हा नव्याने शेणखताची मागणी वाढू लागली आहे. शेणखताच्या वापरल्याने जमिनीतील जैवविविधता टिकून राहते आणि जमिनीचा पोत देखील सुधारत असल्याचा कृषी वैज्ञानिकांचा दावा आहे. यामुळे जमिनीतील पाण्याचा निचरा देखील चांगला होतो.
यामुळे मातीचे संवर्धन होते आणि साहजिकच शेतजमिनीचे आरोग्य सुधारते. शेतजमीन सुपिक बनते आणि पिकांच्या उत्पादन वाढ होते. प्रक्रिया केलेल्या शेणखतांचा वापर केल्यास पिकांना आवश्यक असलेले सर्व सूक्ष्म व इतर अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होते. यामुळे दिवसेंदिवस शेणखताचा वापर वाढत आहे.
हेही वाचा : लिंबाची शेती ठरली शेतकऱ्यासाठी वरदान!! लिंबाच्या शेतीतून कमविले लाखो
Share your comments