शेती करायची म्हंटले की सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे चांगली जमीन, मुबलक पाणी आणि पिकांसाठी पोषक असणारी खते. यामधील एक जरी गोष्ट कमी पडली की शेतमधील पिके चांगली येत नाहीत. त्यासाठी शेती करण्यासाठी सुद्धा काही गोष्टींची आवश्यकता असतेच.
शेतीमधील बदल:-
आजकाल उत्पन्न वाढावे म्हणून शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत शिवाय पीक पद्धती मद्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या मध्ये वाढते यांत्रिकीकरण खतांचा अतिवापर आणि हायब्रीड बियाणे यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यांचा अतिवापर केल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होत आहे. कमी वेळात जास्त उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने शेतकरी रानात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत.
हेही वाचा:-राज्यात वाढता उकाडा,पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्याच्या अंदाज
रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे शेतातील जमीन नापीक बनण्यास सुरुवात होते शिवाय जमिनीतील कृत्रिम जीव नाहीसे होतात आणि जमिनीचे संतुलन बिघडण्यास सुरुवात होते. रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे शेतातील गांडूळ यांचा पूर्णपणे ह्रास होण्यास सुरुवात होते. शेतीसाठी सेंद्रिय खते खूप फायदेशिर असतात. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खत, जैविक खत, माशांचे खत, खाटीक खान्यातील खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड यांचा समावेश होतो. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे शेतीमध्ये अनेक बदल घडून येतात.
सेंद्रिय खतांचा वापर केल्याने झाडे चांगली वाढतात. सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता २० ते ३० टक्क्यांनी वाढते. जिवाणू खतामुळे सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत होते. हे सेंद्रिय खते जमिनीसाठी चांगली असतात शिवाय उत्पन्न वाढण्यास सुद्धा मदत होते.
सेंद्रिय खतांचे फायदे:-
सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहते शिवाय उत्पानवाढीसाठी फायेशीरच असतात. शेतातील मातीमध्ये जिवाणू चे प्रमाण वाढण्यास मदत होते.
मातीतील कणांची रचना दाणेदार बनते, शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून सुपीकता वाढते.
शेतातील मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते. आणि पाण्याचा निचरा सुद्धा अत्यंत व्यवस्थित पणे होतो. जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते.हे जिवाणू विविध अन्नद्रव्ये, वनस्पतींना विद्राव्य व शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये उपलब्ध करून देतात. शिवाय या मद्ये रासायनिक खतांचा वापर होत नसल्याने हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात.
Share your comments