नागपूर म्हणले की आपल्याला आठवते ते म्हणजे तेथील प्रसिद्ध संत्री. मात्र या नागपूरच्या संत्र्यापेकशा विशिष्ट संत्राचा हवाला देत मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील संत्र्याला आता सातपुडा संत्रा असे नाव देण्यात आले आहे. जे की या मागील असे उद्दिष्ट आहे की आपल्या भागाची स्वतःची संत्रा असावी स्वतःचा संत्राचा वाण असावा यासाठी सर्व धपडपड मध्य प्रदेश ची चालू आहे. जे की मध्य प्रदेशातील संत्राच्या वानाला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न देखील सुरू आहेत मात्र तज्ञांनी दावा केला आहे की भौगोलिक मानांकन मिळवण्याच्या प्रयत्नाला यश मिळणे शक्य नाही.
दीड लाख हेक्टरवर होतेय लागवड :-
महाराष्ट्र राज्यामध्ये नागपुरी संत्राची लागवड जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर केली जाते. मध्यप्रदेशातील नागपूर सिमेलगत छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्ना, सौंसर, बिछुआ आणि अन्य भागात नागपुरी संत्राचे चे २५ हजार हेक्टरपेक्ष्या जास्त क्षेत्र आहे. अकोला जिल्ह्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नागपुरी संत्र्याला भौगोलिक मानांकन मिळवले आहे. जे की यामध्ये मध्य प्रदेश भागात सुद्धा नागपुरी संत्र्याची लागवड केल्याचा समावेश आहे.
नागपुरी संत्रा वाणाने अडचणी निर्माण :-
मात्र आता मध्य प्रदेशातील कृषी विभागाने एक जिल्हा एक पीक या अभियान अंतर्गत भागासाठी संत्राची निवड करण्यात आली आहे. परंतु नागपुरी संत्र्याला भौगोलिक मानांकन आहे त्यामुळे मध्य प्रदेशातील संत्र्याला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्यामुळे या भागातील संत्र्याला सातपुडा संत्रा असे नाव देण्यात आले आहे. या संत्राचा वाण येईल या काळामध्ये भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र या संत्राचा वाण नागपुरी संत्राचा असल्याने स्वतंत्र भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी मध्यप्रदेश प्रयत्न करत आहे.
अशी आहेत वैशिष्ट्ये :-
नागपुरी संत्राच्या वाणाची साल घेतली तर त्या तुलनेत या संत्राच्या वाणाची साल पातळ आहे. संत्रा फळाचा रंग प्रमुख आकर्षक असतो. एवढेच नाही तर नागपुरी संत्रा फळाची चव देखील सातपुडा संत्रा वानापेक्षा अधिकच आहे असा दावा केला आहे. मध्य प्रदेश मधील ७० टक्के नागरिक हे नागपूर भागातील संत्रा विकत घेतात. नागपूरच्या संत्राची गुणवैशिष्ट्ये इतर लोकांपर्यंत पोहचावी यासाठी क्यूआर कोड देखील तयार करण्यात आला आहे ज्याच्याद्वारे नागपुरी संत्र्याचा प्रसार केला जाईल.
Share your comments