बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ,सह्याद्री फार्मर प्रोडूसर कंपनी नाशिक ,ॲग्रोवीजन ग्रुप नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेन येथे गेलेले सर्व संत्रा उत्पादक शेतकरी मायदेशात परतले .व्हॅलेन्सिया शहरात मोठ्या प्रमाणात मोसंबी, संत्रा लागवड होते.
लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया व उद्योग, नर्सरी व्यवस्थापन, बाजारपेठस्पेन येथे गेलेल्या सर्व शेतकरी बंधूंनी व्यालेन्सिया येथील संत्रा बागेत भेट दिली . तेथील बगीच्यातील चुनखडीयुक्त मध्यम दर्जाची असून पाच फूट बेडवर संत्रा झाडाची लागवड केली जाते . त्या संत्रा झाडाच्या लागवडीचे अंतर 6×20 वर चार फूट उंचीच्या बेडवर केली जाते. एका हेक्टर मध्ये 820 कलमा या पद्धतीने बसविल्या जातात. संत्राच्या कलमा हा सर्व सरकारच्या नियमांच्या अधीन राहून तयार केल्या जातात तिसऱ्या वर्षापासून संत्र्याच्या झाडाचे पीक घेणं सुरुवात होते . तेथील झाडाची उंची आठ ते दहा फुटावर पर्यंत तेथील प्रत्येक झाडा वरपानांची संख्या भरपूर प्रमाणात आढळून आली.तेथील फर्टीगेशन सरळ ड्रीपच्या माध्यमातून केल्या जाते .
तिथे जास्तीत जास्त मल्चिंग पेपर झाकण्यासाठी वापर केले जातो.तिथे लोक पूर्णपणे सामूहिक शेती त्या देशामध्ये टॅंगो ही व्हेरायटी सगळ्यात जास्त फळपीक देणारी संत्राची जात असून. हेक्टरी उत्पादन 70 टन घेतल्या जाते. तेथील संत्र्याच्या प्रत्येकझाडाची कटिंग 10 पर्सेंट केल्या जाते व वाढलेल्या फांद्या 45 डिग्री अंश सेल्सिअस मध्ये झुकवून दोरीने बेंड करून जमिनीत रोवलेल्या काड्यांना दोरीच्या साह्याने बांधल्या जातात.
विशेष म्हणजे संत्रा ची तोडणी होण्या दोन महिन्यापूर्वी फवारणी बंद केली फवारणीचे तसेच माती ,पाणी परीक्षणाचे निकष तेथील सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या अधीन राहून पूर्णपणे नियम पाडावे लागतात.तेथील तापमान 7 ते 12 डिग्री हिवाळ्यामध्ये तर उन्हाळ्यामध्ये 38 ते 44 डिग्री दरम्यान असते . त्यानंतर कोर्डोबा संत्रा पॅकिंग हाऊस येथे भेट त्यानंतर सेविल येथील पॅकिंग हाऊस व ॲग्रीकल्चर यूनिवर्सिटी येथे भेट देऊन एलईडी स्क्रीन द्वारे माहिती संत्रा वर्गीय फळ पिकाचे तंत्रज्ञान मार्केटिंग व्यवस्थापन जाणून घेतले.
शेवटच्या दिवशी संत्रा उत्पादकशेतकऱ्यांनी स्पेन ची राजधानी माद्रिद लोकसभा भवन तेथील बाजारपेठ येथे सुद्धा भेट दिली.या दौऱ्यामध्ये श्री नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भारत सरकार ,कांचनताई नितीनजी गडकरी, विलासजी शिंदे सह्याद्री फार्मर प्रोडूसर कंपनी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संस्थापक, अजहर तंबूवाला सहकारी संस्थापक आणि कार्यकारी संचालक, पवन मोहरुत सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी अधिकारी, प्रवीण शेळके सह्याद्री फार्मर प्रोडूसर कंपनी अधिकारी अरुण आकोटकर, नाथा पाटील ,अपूर्व जवंजाळ ,श्रीधर ठाकरे अजिंक्य तिडके ,मनोज जवंजाळ, निलेश रोडे, राकेश मानकर ,मोरेश्वर वानखडे, आकाश पवार, प्रशांत कुकडे, नवीन पेठे, विठ्ठल भोसले ,प्रल्हाद शेळके ,सुहास तेल्हारकर ,स्वप्निल धोटे ,तुषार तायवाडे, शिवदीप भुमरे, अनिल राऊत, विशाल लंगोटे ,सुधीर दिवे, रवींद्र बोरटकर, उद्धव फुटाणे, व्यंकट शिंदे, विनोद राऊत ,पुष्पक खापरे, हे सर्वजण शेतकरी दौऱ्यामध्ये होते. शेतकऱ्यांना सुद्धा नवीन तंत्रज्ञान शास्त्रज्ञ यांच्या माध्यमातून भरपूर काही माहिती मिळाली. त्याबद्दल सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आभार मानले.
पुष्पक श्रीरामजी खापरे
अमरावती, महाराष्ट्र
Share your comments