1. बातम्या

आचार्य पदवीकांक्षीकडूनच दीक्षांत समारोहास सार्वत्रिक विरोध; विद्यापीठाच्या नियमबाह्य व आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थी संतप्त

कोव्हीड -19 प्रादुर्भावाने राज्यात थैमान घातलेले असतानाही सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 35 वा दीक्षांत समारोहास खुद्द आचार्य पदवीकांक्षीकडूनच विरोध असल्याचे उघड आले आहे. विशेष म्हणजे हा सोहळा राज्यपाल तथा कुलपती यांचे परवानगीने व कार्यकारी परिषदेच्या संमतीने होत असल्याची पाठराखण केली जात असताना राज्यातील कृषि आचार्य पदवीधारक संघटना अग्रीकल्चरल डॉक्टरेट असोशीएशनने या समारंभाची नियमबाह्यता सिद्ध करणारे विस्तृत निवेदन प्रशासनास दिले आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा अजून एक वाद

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा अजून एक वाद

कोव्हीड -19 प्रादुर्भावाने राज्यात थैमान घातलेले असतानाही सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 35 वा दीक्षांत समारोहास खुद्द आचार्य पदवीकांक्षीकडूनच विरोध असल्याचे उघड आले आहे.

विशेष म्हणजे हा सोहळा राज्यपाल तथा कुलपती यांचे परवानगीने व कार्यकारी परिषदेच्या संमतीने होत असल्याची पाठराखण केली जात असताना राज्यातील कृषि आचार्य पदवीधारक संघटना अग्रीकल्चरल डॉक्टरेट असोशीएशनने या समारंभाची नियमबाह्यता सिद्ध करणारे विस्तृत निवेदन प्रशासनास दिले आहे. याबाबत अधिक जाणून घेतले असता, दीक्षांत समारोहात उपस्थितीत पदवी ग्रहण करण्यासाठी विद्यापीठाने केवळ आचार्य पदवीधारक विद्यार्थ्याना पात्र करणे, समारंभास उपस्थितीसाठी केवळ विद्यार्थाना कोव्हीड चाचणीचा अहवाल बंधनकारक करणे, राज्यशासनाने टाळेबंदी जाहीर करत अनावश्यक प्रवासास बंदी घालणे, नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थी आणि विद्यार्थीनीना छायाचित्राची मागणी करणे, समारंभासाठी नोंदणी केलेल्या  २० पैकी १८ आचार्य पदवीकांक्षीनी विद्यापीठ प्रशासनास विनंती करूनही दुर्लक्ष करणे या सोबतच  दीक्षांत समारोहासाठी आखून दिलेल्या महाराष्ट्र कृषि विद्यापीठ कायदा 1983 (2012) अंतर्गत कृषि विद्यापीठे परिनियम - 1990 (Maharashtra Agricultural Universities Statutes -1990) चा पूर्णत भंग होत असल्याचे सप्रमाण सिद्ध करत या सोहळ्याच्या कायदेशीर वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 

कुलसचिवांना दिलेल्या निवेदनाच्या प्रतिलिपी राज्यपाल तथा महामहीम कुलपती श्री. भगतसिंहजी कोश्यारी , मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे, कृषिमंत्री तथा कृषि विद्यापीठांचे प्रतीकुलपती श्री. दादाजी भुसे यांचेसह मंत्रीमंडळातील संबंधित खात्यांचे मंत्री, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त अमरावती, अकोला जिल्हा प्रशासन यांना देण्यात आल्या आहेत. या मुद्यावर अग्रीकल्चरल डॉक्टरेट असोशीएशन, कृषि योद्धा संघटना, पदवीधर संघटना, प्रहार संघटना यांच्या सोबतच इतरही संघटना एकवटल्या आहेत. राज्यात कोव्हीड रोगाची मृत्युघंटा वाजत असताना विद्यार्थी समंजस भूमिका घेत आहेत तर स्वत: शिक्षक असलेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे प्रशानासतील अधिकारी कोव्हीड साखळी तोडण्यासाठी शासनास हातभार लावण्याऐवजी “मेक द कोव्हीड चैन” हा अविवेकी अभिनव प्रयोग राबवीत असल्याने विद्यार्थीच विद्यापीठाबाबत नकारात्मक झाले आहेत.

 

विद्यार्थ्यांचा विरोध डावलून कोव्हीड प्रादुर्भाव त्याच्या संसर्गाच्या उच्च पातळीवर असताना दीक्षांत समारोह घेऊन विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या, विद्यापीठातील कर्मचार्यांच्या त्यांच्या कुटुंबांच्या आणि पर्यायाने राज्यातील जनतेच्या जीवितास धोका निर्माण केल्यास त्याची संपूर्ण जवाबदारी ही विद्यापीठ प्रशासनावर असेलअसा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया –

ज्यांच्या कौतुकासाठी हा सोहळा आयोजित केला जात असल्याची बतावणी विद्यापीठ प्रशासन करत आहे, त्या विद्यार्थ्यांचाच विरोध असताना डॉ. पंदेकृवि प्रशासनाचे अविबेकी धोरण विद्यार्थी विरोधी आहे.

डॉ. रोहित गोपीचंद चव्हाण (अध्यक्ष, अग्रीकल्चरल डॉक्टरेटस असोशीएशन)

दीक्षांत समारोहाचे आयोजन कृषि विद्यापीठे परिनियमांची पायमल्ली करणारे असून याबाबत राजभवन, राज्यशासन, कार्यकारी परिषद यांची दिशाभूल केली जात असल्याची दाट शंका आहे. ज्या ऑनलाइन सोहळ्याबद्दल सांगितले जात आहे, त्यास विद्यापीठ नियमावलीत थारा नाही.

डॉ. संदिप विनायक बोन्द्रे (आचार्य पदवीकांक्षी)         

 

विरोध डावलून कोरोनाच्या दुखदायी परिस्थितीत समारंभ घेतल्यास कायदेशीर मार्गाने विरोध केला जाईल.

ज्ञानेश्वर खरात पाटील (अध्यक्ष, कृषियोद्धा संघटना, महाराष्ट्र)

दीक्षांत समारंभाच्या आयोजनातून विद्यार्थी, कर्माचारी यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी विद्यापीठ प्रशासनाची असेल.

प्रणव रमेशराव टोम्पे (अध्यक्ष, पदवीधर संघटना, महाराष्ट्र) 

या प्रकरणाची दखल अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. बच्चूभाऊ

कडू यांनी घेतली असून त्याबाबतीत प्रशासनास निर्देश देण्याबाबत त्यांनी सांगितले आहे.

ऋषभ शामसुंदर गावंडे (प्रहार संघटना)

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

मो-950353757

English Summary: opposed to Dr. Punjabrao Deshmukh Agricultural Universities Convocation Ceremony Published on: 23 April 2021, 06:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters