ऐकलं का ! आयटीआय झालेल्यांसाठी नौदलात नोकरीची संधी

23 February 2021 05:51 PM By: KJ Maharashtra
नौदलात नोकरीची संधी

नौदलात नोकरीची संधी

दहावी झाल्यानंतर आयटीआय पूर्ण केल्याची संख्या महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात आहे. आयटीआय करण्यामागे मुख्यतः स्वतःच्या पायावर उभे राहणे हाच प्रमुख उद्देश असतो. आयटीआय मध्ये विविध प्रकारच्या ट्रेड मध्ये आयटीआय पूर्ण करून संबंधित ट्रेड च्या अनुषंगाने व्यवसायात पदार्पण करता येते.

परंतु ज्या उमेदवारांनी आयटीआय पूर्ण केले आहेत त्यांच्यासाठी भारतीय नौदलामध्ये शेकडो जागांवर नोकरीची संधी चालून आलेली आहे. इंडियन नेव्ही ने एंट्रन्स परीक्षेद्वारे ट्रेडमन मेट साठी जवळजवळ बाराशे पदांवर भरती काढली आहे. तरी या भरती बद्दल सविस्तर माहिती या लेखात घेऊ.

 या भरतीत असलेले पद आणि पदसंख्या

 पदाचे नाव – ट्रेडस मन मेट

 विभागवार पदसंख्या

  • ईस्टर्न नेव्हल – एकूण 710 पदे
  • वेस्टर्न नेव्हल- एकूण 324 पदे
  • सदर्न नेवल- -125 पदे

एकूण पदांची संख्या आहे अकराशे 59

या पदासाठी कमीत कमी 18 हजार रुपयांपासून ते 56 हजार 900 रुपयांपर्यंत प्रति महिना पगार आणि केंद्र सरकारचे विविध भत्ते असा पगार दिला जाणार आहे.

 वयाची अट

 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 ते कमाल 25 वर्ष असायला हवे.  तसेच जे उमेदवार आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे.

 

शिक्षणाची अट

 उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून  दहावी पास असावा तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय झालेला असावा.

 अर्ज करण्यासंबंधीची लिंक

 या पदांसाठी इंडियन नेव्ही च्या अधिकृत संकेतस्थळ joinindiannavy.gov. in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात ही 22 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून सात मार्च संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे.  जनरल, इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी, इ डब्ल्यू एस साठी अर्ज शुल्क हे दोनशे पाच रुपये आहे. इंडियन नेव्ही मध्ये निघालेल्या या भरतीची परीक्षाही ऑनलाइन आधारित असणार आहे.

 

 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

https://mahabharti.in/indian-navy-recruitment-2021

 

ITI passed student ITI Navy आयटीआय नौदलात नोकरीची संधी नौदलात नोकरी इंडियन नेव्ही Indian Navy
English Summary: opportunities in the Navy for ITI passed student

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.