सध्या उसाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. ते राज्यात ऊस परिषदा घेऊन ऊस कारखानदारांविरोधात आवाज उठवत आहेत. आता त्यांची इंदापूर तालुक्यातील सणसर येथे ऊस परिषद पार पडली.
येथील छत्रपती कारखान्याच्या निवडणूकीला अजून अवधी असला तरी विरोधकांनी वातावरण आतापासूनच तापवले आहे. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, अविनाश घोलप तसेच सतीश काकडे उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांनी सहकार्य केल्यास आपण स्वतः उभे राहू असे सतीश काकडे यांनी सांगितले. यामुळे आता जाचक-घोलप-काकडे एकत्र दिसणार का अशी चर्चा छत्रपतीच्या सभासदांमध्ये आहे. सध्या जाचक हे कार्यक्षेत्रातील विरोधकांची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत.
सणसर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद झाली. यावेळी विरोधकांमध्ये कोणा कोणाची उपस्थिती दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी व्यासपीठावर अविनाश घोलप यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरला.
राजकारणातून काहीसे बाजूला गेलेले अविनाश घोलप यांनी उपस्थिती दाखवत छत्रपतीच्या निवडणूकीत रंगत आणली आहे. जाचक यांनी घोलप यांना तिसऱ्यांदा एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. सगळे एकत्र राहिले तर आपण इतिहास घडवू असे सांगितले.
तसेच या सभेत शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आपण सोसायटी मतदारसंघातून छत्रपती कारखान्याची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे जाहीर केले. यामुळे याची देखील चर्चा सुरू आहे. घोलप यांनी छत्रपती कारखाना सध्या 3 हजार रुपये भाव देता येऊ शकतो, अशी मागणी त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या;
सरकारने जाहीर केली मदत! अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
काय सांगता! आता पिकाचे भविष्य आधीच कळणार, पितळे बंधूंचे अनोखे स्टार्टअप
इथेनॉलच्या किमती वाढणार, खतांवर सबसिडीही मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा..
Share your comments