सध्या उसाचा हंगाम सुरू आहे. कारखाने देखील यंदा जोमाने सुरू आहेत. असे असताना मात्र अजून हंगाम संपण्यास अवधी असला तरी शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे. ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहेत.
अनेक ठिकाणी साखर कारखान्यात ऊस तोडणीसाठी (Sugarcane Worker Mukadam) सर्रास मुकादमांकडून पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
दरम्यान, याबाबत मंत्री संदीपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांनी दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी ऊस उत्पादकांकडून होत आहे. अजून कारखाने सुरू आहेत. अजून अवधी असला तरी पैसे घेतले जात आहेत.
पैठण तालुक्यात उसाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. परिसरात ऊस देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने आपला ऊस तुटून जाईल की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
उसाची नोंदणी केली असताना कारखान्याचे कर्मचारी यंत्रणा सोडून मुकादम स्वतःच उसाचे फड ठरवीत आहेत. मुकादम एकरी ५ ते १० हजार रुपयांची मागणी करत आहेत. तर, प्रत्येक बैलगाडीसाठी ३०० ते ५०० रुपयांचा दर ठरला आहे.
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना केवळ स्वप्न दाखवले? अर्थसंकल्पात भरीव काहीही नाही..
यामुळे बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लाखोंची लुट सुरू आहे. पैसे न दिल्यास या टोळ्या ऊसच तोडत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव टोळ्यांना पैसे द्यावे लागत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो कांदा बीजोत्पादन व्यवस्थापन
टोमॅटो लागवड तंत्र
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार होते, त्याचे काय झाले? अर्थसंकल्पावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका
Share your comments