1. बातम्या

Pan Card ला Aadhar Card लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस, अन्यथा..

आधार -पॅन जोडणी

आधार -पॅन जोडणी

Pan Card ला  Aadhar Card लिंक करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस उरले असून 31 मार्चपर्यंत  पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केलं नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद पडणार आहे. केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केले आहे.

एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पॅन कार्ड त्यांच्या आधारला लिंक करावं लागणार आहे. तसे जर नाही केल्यास त्या कर्मचाऱ्यांना 20 टक्के अतिरिक्त कर द्यावा लागणार आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे.या आधीही सरकारन पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अनेकदा डेडलाईन वाढवली होती. गेल्या आठवड्यात लोकसभेत या संबंधी अर्थ विधेयक, 2021 पारित करण्यात आलं आहे. त्यानुसार आता नागरिकांनी आपल्या पॅन कार्डला आधार लिंक केले नाही तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

हेही वाचा : मतदारांना आता मिळणार डिजिटल वोटर आयडी

आपल्या पॅन कार्डला आधारशी लिंक खालील प्रकारे करता येईल

  1. आयकर ई-फायलिंग वेवसाइट

2.567678 किंवा 56161 या नंबरला sms करून.

जर मोबाईलच्या माध्यमातून लिंक करायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाइप करा आणि  567678 किंवा 561561 या नंबरवर sms पाठवा.

 

ऑनलाइन पद्धतीने लिंक करता येईल

  1. आयकरच्या वेबसाइटला https://incometaxindiaefiling.gov.in भेट द्या.

  2. त्यामध्ये पॅनला आधार लिंक करण्याचा पर्याय समोर येईल. तो क्लिक केल्यानंतर एक फॉर्म समोर येईल.

  3. त्यावर तुमचा पॅन क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाकावा. तसेच इतर व्यक्तिगत माहिती भरावी लागेल.

  4. त्यावेळी तुम्हाला एक ओटीटी क्रमांक येईल. तो ओटीटी क्रमांक भरल्यानंतर लिंक आधार असा पर्याय समोर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक होईल.

 

इतर सुविधांच्या लाभापासून वंचित

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड  (CBDT) ने स्पष्ट केलंय की नागरिकांना त्यांना दिलेल्या वेळेच्या आत त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करावे. असे केले नाही तर संबंधित पॅन कार्ड बंद होईल. त्यामुळे अनेक आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. तसेच बँक खाते उघडणे, बँकांचे व्यवहार, सरकारी पेन्शन, एलपीजी सब्सिडी, स्कॉलरशीप अशी अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागेल.

 

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters