सध्या ग्रामीण भागात तरुणांचे लग्न होणे खूपच अवघड झाले आहे. यामुळे मुलाचे वय होऊन देखील त्यांना मुलगी मिळत नाही. अनेक तरुण चाळीशीच्या घरात गेले आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. असे असताना किर्तनकार इंदोरीकर महाराजांच एक विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. इंदोरीकरांनी तरुणांना दिलेले विनोदी सल्ले, महिलांविषयी केलेले वक्तव्य प्रचंड चर्चेत असते. आता देखील त्यांच्या किर्तनातील एक वक्तव्य व्हिडीओमधून चांगलेच चर्चेत आले आहे.
या व्हिडीओत ते तरुणांना म्हणताना दिसत आहेत की, सतरंज्या झटकून जगण्यापेक्षा म्हशी सांभाळून जगा. कुण्याच्याही मागे जाऊ नका. विशेषत: राजकारण्यांच्या मागे. ते तुम्हाला सिझनपर्यंत सांभाळतील, आम्ही तुम्हाला कावळा शिवेपर्यंत सांभाळू, राजकारणात शंभरातले पाचच लोक यशस्वी होतात. बाकीचे सतरंज्या झटकून मेले तर काय फायदा? हे बुटाचं पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुटं चाटून जगणारं रक्त नाही, असंही ते म्हणाले.
तसेच ते म्हणाले, तरुणांनो व्यवसाय करा, आता बायका मिळणं अवघड झाल आहे. आता पहिला जमाना राहिला नाही. 20 एकर जमीन आहे, म्हणून तुम्हाला कोणी पोरगी देणार नाही. व्यसनं सोडा तरच तुमचं भलं आहे. अशा पध्दतीने त्यांनी तरुणांना मोलाचे संदेश दिले आहेत. त्यांच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी शेअर केले आहे. युट्युबवर तर हजारोंच्यावर व्हिडीओला लाईक्स आल्या आहेत. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
इंदोरीकर महाराजांची सोशल मिडीयावर एक विनोदी किर्तनकार म्हणून ओळख आहे. त्यांचे व्हिडीओ यूझर्सही आवडीने पाहतात. इंदोरीकरांचे किती जुने किर्तन असले तरी ते लोकांना आवडतेच. ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यापूर्वी महिलांविषयी केलेल्या चुकिच्या वक्तव्यांमुळे इंदोरीकर चर्चेत आले होते. अनेक महिला संघटनांनी त्यांच्यावर आक्षेप सुध्दा नोंदविला होता. मात्र त्यांचे कीर्तन अनेकजण बघतात.
Share your comments