1. बातम्या

फक्त सहा महिन्यांची करा FD; ज्येष्ठ नागरिकांना मिळते दमदार व्याज

आपल्यातील बरेच जण आहेत, जी आपला पैसा व्यवस्थित शिल्लक ठेऊ शकत नाहीत. पैशाची व्यवस्थित गुंतवणुकीचा पर्याय माहिती नसल्याने अनेकजण आपल्याकडील रोख रक्कम लवकरच खर्च करत असतात आणि आवश्यक त्यावेळी त्यांच्या हातात पैसा नसतो.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


आपल्यातील बरेच जण आहेत, जी आपला पैसा व्यवस्थित शिल्लक ठेऊ शकत नाहीत. पैशाची व्यवस्थित गुंतवणुकीचा पर्याय माहिती नसल्याने अनेकजण आपल्याकडील रोख रक्कम लवकरच खर्च करत असतात आणि आवश्यक त्यावेळी त्यांच्या हातात पैसा नसतो. शेतकऱ्यांवर अशीवेळ अनेकवेळा येत असते. बँकेची सेवा घेताना आपल्या अनेक ऑफरची माहिती नसते. बँक आपल्याल पैसाला सुरक्षित ठेवण्याबरोबर आपल्याला योग्य असे व्याजदरही देत असते. शिवाय कर्जाची सेवा तर नेहमीच असते.

आज आपण एसबीआय बँकेसह अन्य चार बँकांची फिक्स निश्चित कालावधीसाठी पैसा ठेवण्याच्या सेवेविषयी जाणून घेणार आहोत. फिक्स डिपॉझिट म्हटलं म्हणजे अनेकांच्या भुवया उंचावत असतात. कारण फिक्स डिपॉझिटचा कालावधी अधिक असल्याने बरेच ग्राहक त्यासाठी तयार नसतात. अशा ग्राहकांसाठी बँकांनी एक नवी ऑफर आणली आहे, यात आपण फक्त सहा महिन्यासाठी फिक्स डिपॉझिट ठेवू शकतो. विशेष म्हणजे या सहा महिन्याच्या कालावधीसाठी बँक चांगल्याप्रकारे व्याजही देत आहेत.

 

जर आपण फळबागायतदार असाल आणि आपली कमाई ही कोटीच्या घरात असेल तर आपण या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. इतर नोकरदारही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. 

(State Bank Of India) भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया - ही  २ कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेसाठी एफडी करण्यावर चांगले व्याजदर आकारते. सहा महिन्याच्या एफडीला ४.४० टक्के व्याज देते.  तर कोणी ज्येष्ठ व्यक्ती जर २ कोटी रुपयांची एफडी करत असले तर ४.९० टक्के व्याजदर बँक देत असते. २ कोटीपेक्षा अधिकच्या रक्कमेसाठी बँक २.९० टक्के व्याज देत असते.

 


पंजाब नॅशनल बँक (punjab national bank) - दोन कोटी पेक्षा कमी रक्कमेसाठी एफडी केल्यास पीएनबी  ४.५० टक्के व्याज देते. तर ज्येष्ठ नागरिकांनी येथे एफडी केल्यास त्यांना ५.२५ टक्के व्याज दिली जाते. २ ते १० कोटी रुपयांच्या एफडीवर वार्षिक ३.२५ टक्के व्याज दिले जाते.

HDFC - बँकेत २ कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेसाठी ६ महिन्याच्या कालावधी करता एफडी केल्यास ४.१० ट्क्के व्याज दर दिले जाते. तर ज्येष्ठ व्यक्तिस ४.६० टक्के ठेवलेल्या रक्कमेवर व्याज मिळत असते. दोन कोटी पेक्षा अधिक रक्कमेची एफडी केल्यास ३.५० ट्केक व्याजदर बँक देत असते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक वार्षिक ४ टक्के व्याज देते.

ICICI बँक- प्रीमॅच्युर विदड्रॉअल फॅसिलिटीची २ कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेच्य़ा एफडीवर बँक ४.२५ टक्के वार्षिक व्याज देत असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ४.७५ टक्के व्याज दर देत असते.  दोन कोटी ते ५ कोटी रुपयांच्या एफडीवर बँक  ३.५० ट्क्के व्याज देते.

English Summary: Only six months do FD, senior citizens get good interest Published on: 11 August 2020, 07:37 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters