राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख तसेच शेतकरी नेते म्हणून संपूर्ण देशात विख्यात माननीय शरद जी पवार (NCP chief Sharad Pawar) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऊस उत्पादक शेतकर्यांची (Sugarcane Producer) कान उघाडणी केली होती. नुकत्याच काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सांगितले की, शेतकरी बांधव पाणी दिसले की कांडी लावतात मात्र हे पूर्णतः चुकीचे धोरण आहे. आतादेखील शरद पवार यांनी अतिरिक्त उसाचा (Extra sugarcane) प्रश्न ऐरणीवर असतांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले असून एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे.
शरद पवार यांचा शेतीमध्ये मोठा गाढा अभ्यास आहे. त्यामुळे सध्या राज्यात अतिरिक्त उसाचा (Sugarcane Sludge) प्रश्न ऐरणीवर असताना त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक कानमंत्र दिला आहे. यंदाचा गाळप हंगाम (Sugarcane Threshing season) सुरू होऊन सुमारे सहा महिने उलटले आहेत तरीदेखील 90 लाख टन राज्यात अजूनही गाळप विना फडातच उभा आहे.
अतिरिक्त उसाचा प्रश्न हंगामाच्या अंतिम टप्प्यात देखील कायम असल्याने अतिरिक्त उसाची परिस्थिती निर्माणच का झाली या विषयावर शरद पवार यांनी हात घातला आहे. फक्त विषयावरच पवार यांनी घाव घातला नसून भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी शेतकऱ्यांना कानमंत्र देखील दिला आहे. शरद पवार यांच्या मते ऊस हे केवळ आळशी शेतकऱ्यांचे पीक आहे. अर्थात एकदा ऊस लावला की त्यासाठी जास्त श्रम घ्यावे लागत नाही.
अगदी लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व कामे यंत्राच्या साह्याने होत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा ऊस लागवडीकडे वाढला आहे. म्हणूनच पवार यांनी शेतकऱ्यांना खोचक टोला देत ऊस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक आहे असे म्हटले. उसाला काय दर मिळेल? याचे गाळप होईल की नाही? या बाबींचा विचार न करता केवळ लागवड करण्यास सोपे व यासाठी अधिक श्रम घ्यावे लागत नसल्याने शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे वाढत आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी हंगामी पिकांची जास्त लागवड करावी तसेच फळबाग पिकांची देखील लागवड करावी असा कानमंत्र यावेळी पवार यांनी ऊस उत्पादकांना दिली आहे. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारणाच्या कामाला गती मिळत असल्याने उसाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतकरी बांधवांसाठी देखील ऊस हे एक चांगले पीक आहे. असे असले तरी उत्पादन वाढीच्या अनुषंगाने देखील शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अर्थातच शेतकरी बांधवांनी उसाचे उत्पादन घ्यावे मात्र त्याच्या जोडीला हंगामी पिकांची तसेच फळबाग पिकांची देखील लागवड करावी.
सर्व शेतकरी बांधव फक्त ऊस आणि ऊसच लावत असतील तर निश्चितच हे धोरण चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या या एकाच पीक पद्धतीमुळे जमिनीचा पोत देखील खालावत असल्याचे सांगितले जात आहे. ऊस हे एक मोठे नगदी पीक आहे, असे असले तरी खरिपातील सोयाबीन आणि कापूस पिकाला ही आता चांगला दर मिळू लागला आहे.
या वर्षी कापसाला तर कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळाला आहे. या वर्षी कापूस 12 हजार रुपयांच्या घरात पोहोचला असून सोयाबीन देखील आठ हजारांच्या पल्ल्यात आला आहे. यामुळे ऊस व्यतिरिक्त देखील अशी असंख्य पिके आहेत जी शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरू शकतील. माननीय पवारांचा हा सल्ला शेतकरी बांधव ऐकतात की नाही आणि ऊसाला फाटा देत हंगामी पिकांची तसेच फळबागांची लागवड करतात की नाही हे विशेष पाहण्यासारखे राहील.
Share your comments