1. बातम्या

कांद्याने एकाच रात्रीत शेतकऱ्यांना रडवले, एका रात्रीतच मोठ्या प्रमाणावर दर घसरले..

कांद्याच्या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून असतात. असे असताना काही दिवसांपासून कांद्याच्या पिकातून चांगले पैसे मिळत आहेत. यामध्ये आवक वाढूनही (Onion Rate) दर स्थिर होते. मात्र, आता (Summer Onion) उन्हाळी हंगामातील कांदा बाजारात दाखल झाला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
onion

onion

कांद्याच्या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून असतात. असे असताना काही दिवसांपासून कांद्याच्या पिकातून चांगले पैसे मिळत आहेत. यामध्ये आवक वाढूनही (Onion Rate) दर स्थिर होते. मात्र, आता (Summer Onion) उन्हाळी हंगामातील कांदा बाजारात दाखल झाला आहे. मागणीच्या तुलनेत अधिकची वाढ झाल्याने शनिवारच्या तुलनेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 550 रुपयांनी दर घसरले. यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

यामुळे काही वेळेतच शेतकऱ्यांना कसा फटका बसतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आणले आहे. देशांतर्गतच्या मुख्य बाजारपेठात लाल कांद्याची आवक वाढली आहे. तर नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारावर झाला आहे.

यावर्षी उन्हाळी कांद्याचे क्षेत्र वाढलेले आहे. शिवाय सध्याच दर हे टिकून असल्याने छाटणी झाली की लागलीच विक्रीवर भर दिला जात आहे. त्यामुळे लाल कांद्याची सरासरीएवढी आवक होत असताना त्यामध्ये आता उन्हाळी कांद्याची भर पडल्याने अचानक 550 रुपयांनी दर घसरले आहेत. येणाऱ्या काळात देखील जर आवक वाढली तर दरामध्ये चढउतार होण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लासलगाव बाजार समितीत कमाल 2625 रुपये, किमान 651 रुपये तर सर्वसाधारण 2100 रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला होता तर आज सोमवारी 1 हजार वाहनातून पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाली कमाल 2077 रुपये, किमान 900 रुपये तर सर्वसाधारण 1750 रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यामुळे आता आवक देखील कमी होण्याची शक्यता आहे. तसेच रशिया-युक्रेन वादामुळे देखील कांदा निर्यातीवर परिणाम होत आहे.

English Summary: Onions made farmers cry in one night, prices dropped drastically in one night. Published on: 28 February 2022, 05:41 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters