शेतकरी संकटात सापडला आहे. आता कांद्याला योग्य भाव नसल्याने शेतकरी (Farmer) हतबल झाले आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (onion crop farmer) एक ते दोन रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे. अनेक मार्केटमध्ये हीच अवस्था आहे.
शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी
कांदा लागवडीपासून ते कांदा काढणी पर्यंत खूप खर्च होत आहे. आता झालेला खर्च ही निघत नाही. शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना 2 ते 4 रुपये किलो प्रमाणे कांदा विकावा लागत आहे. बाजारभावावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. आज महाराष्ट्र आणि गुजरातमधील शेतकऱ्यांना सरासरी एक ते चार रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही.
पपई फळबाग लागवड आणि व्यवस्थापन
उत्पादनासाठी प्रति किलोला 7 रुपये खर्च
कांदा बाजारभावावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. महागाई वाढल्यामुळे कांदा उत्पादनाचा खर्च ही वाढला आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनने 2014 मध्येच दिलेल्या अहवालानुसार कांदा उत्पादनासाठी प्रति किलोला 7 रुपये खर्च येतो.
हातात पैसे टिकत नाहीत का? मग करा 'हा' एकच उपाय; कायम राहणार खिशात पैसे
कांदा कोणाला एकदम श्रीमंत नाही तर रस्त्यावर आणतो. बऱ्याचदा असे आढळून आले आहे की, कांदा व्यापारी श्रीमंत आणि जवळचे संबंध असणाऱ्या १-२ शेतकऱ्याच्या मालाला सर्वात जास्त भाव देतात. आणि तो मिळालेला जास्त भाव सर्वत्र गाजावाजा करून मिरवला जातो. अन् बाकी शेतकऱ्यांना सांगितले जाते की, तुमच्या मालाची क्वालिटी (गुणवत्ता) चांगली नाही म्हणून तुम्हाला कमी भाव मिळतोय. ही परिस्थिती बदलली पाहिजे. - युवा शेतकरी जैद शेख.
युरिया खत खरेदीसाठी नवा नियम लागू; तीन गोण्यांसोबत घ्याव्या लागणार "या" दोन बाटल्या
Share your comments