Onion Subsidy : सध्या राज्यभरात कांद्याच्या दराचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कांद्याच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांद्याला कवडीचाही दर मिळत नसल्यामुळे कांदा बाजारात विकायला न्यावा की नाही?
असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. कारण बाजारात कांदा विक्रीस नेल्यानंतर कांद्याची पट्टी हाती येत नाही. मात्र, शेतकऱ्यांना आपल्या खिशातीलच पैसे कांद्यासाठी मोजावे लागत आहेत. म्हणून राज्यातील कित्येक शेतकरी कांद्यावर थेट रोटर फिरवत आहेत. याच कांदा प्रकरणी आता राज्य सरकार जागृत झालं आहे आणि कांदा उत्पादकांना अनुदान देण्याच्या चर्चा सुरू आहेत.
कांद्याला मिळणार अनुदान
सध्या कांदा उत्पादक शेतकरी (Agricultural Information) अडचणीत आहेत. सतत कांद्याला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे याबाबत चर्चा सुरू आहेत. राज्य सरकार कांदा उत्पादकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी अनुदान देण्याबाबत चर्चा करत आहे. याचा अहवाल पुढील आठवड्यात येऊ शकतो.
किती मिळणार अनुदान?
आता शेतकऱ्यांना कांद्यासाठी किती अनुदान मिळू शकते ही गोष्ट महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना कांद्यासाठी प्रतिक्विंटल 200 ते 500 रुपये अनुदान देण्याबाबत चर्चा सुरू आहेत. कारण कांदा उत्पादक शेतकरी सध्या दरामुळे संकटात आहेत. याच कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून एक समिती गठीत करण्यात आली आहे. याच समितीचा अहवाल पुढच्या आठवड्यात येऊ शकतो.
Share your comments