कांदा बियाणे ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय हा मागच्या वर्षी देखील झाला होता. कारण करणामुळे मागच्या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा बियाण्याची विक्री कशी करावी असा प्रश्न विद्यापीठाचे अधिकारी वर्गाला होता. कारण विद्यापीठाच्या कांदा बियाण्याला प्रचंड मागणी असते व बियाणे विक्री पोलीस संरक्षणात सुद्धा करावे लागते. मागच्या वर्षी ज्या ऑनलाइन नोंदणीला अडचणी आल्या होत्या त्या दूर करून संगणकीय प्रणाली मध्ये सुधारणा करून कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने कांदा बियाणे विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे कांदा बियाणे कसे बुकिंग करावे?
नोंदणी पद्धत अत्यंत साधी आणि सोपी असून आधार कार्ड आणि सातबारा उतारा या पोर्टलवर अपलोड करून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी पूर्ण होताच डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत पोर्टलवर बियाण्यांची उपलब्धता दिसते तोपर्यंत बियाणे नोंदणी करावी.पोर्टल वरील बियाणे उपलब्धता संपताच पुढे नवीन नोंदणी व्यवस्थेमध्ये होणार नाही याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन डॉ. सोळंकी यांनी केले आहे
. या शेतकऱ्यांची बियाणे नोंदणी यशस्वी झाली आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या संशोधन केंद्रावर उदा. पिंपळगाव बसवंत, धुळे, राहुरी इत्यादी ठिकाणी बियाणी पुरवण्याची व्यवस्थाडॉ.प्रमोद बेल्हेकर आणि त्यांच्या विपणन ग्रुप कडून पार पाडण्यात येणार आहे.
मेझॉन, फ्लिपकार्ट ऑनलाईन कंपनीच्या नोंदणी प्रमाणेच फुले ऍग्रो मार्ट पोर्टलवर नोंदणी करून लगेचच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्डद्वारे पैसे भरून नोंदणी पूर्ण करता येईल, अशी माहिती बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञडॉ.आनंद सोळंके यांनी दिली
https://www.phuleagromart.org या वेबसाईटवर 11 जून पासून ते बियाणे संपेपर्यंत कांदा बियाणे खरेदीची नोंदणी करता येणार आहे.
सौजन्य- सकाळ
Share your comments