गेल्या दोन महिन्यांत कांद्याच्या बाजारपेठेत आमूलाग्र बदल झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला विक्रमी भाव होता. आता मात्र कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे. काही दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण होत असल्याने बळीराजाला काहीच मिळत नाही. मागणीपेक्षा कांद्याचा पुरवठा अधिक होत असल्याने कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस घसरत आहेत.
कांद्याला निच्चांकी भाव
कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पैठणच्या बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल 100 रुपये कमी भाव मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या पाच वर्षांनंतर कांदा 100 रुपये प्रतिक्विंटलवर आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पैठण बाजार समितीत इतर ठिकाणाहूनही कांद्याची आयात केली जात आहे. तीन दिवसांपूर्वी कांद्याला 200 ते 900 रुपये भाव मिळाला होता. मात्र, सततच्या वाढत्या आवक यामुळे दोन दिवसांत कांद्याचे भाव 240 रुपयांवरून 100 रुपये प्रतिक्विंटलवर गेले आहेत.
नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी
नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने बाजार समितीत कांदा खरेदी सुरू केली आहे. व्यापारी आणि नाफेड यांच्यात बाजारभावाची स्पर्धा झाल्यास याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल. सुरुवातीच्या काळात बाजार आणि नाफेडच्या दरात फारसा फरक नसला तरी भविष्यात शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतवारीनुसार कांदा आणल्यास त्याचा अधिक फायदा होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
Central Government : अतिरिक्त खताच्या वापराबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
सरकार शेतकऱ्यांना देणार तीन हजार रुपये महिना; लवकर नोंदणी करा आणि घ्या लाभ
Share your comments