मार्च महिन्याची सुरुवात झाली आणि कांद्याचे दरात घसरण देखील व्हायला चालू झाले आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे उन्हाळी कांद्याची आवक बाजारपेठांमध्ये सुरू झाल्याने दर कमी झाले असून येणाऱ्या काळात अजून दर घसरतील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
पावसाळी कांद्याचे हंगामामध्ये पावसाने हजेरी लावल्याने पावसाळी कांद्यावर विपरीत परिणाम झाला होता व उत्पादन घटले होते.त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये एवढा फरक न पडता दर हे चढेच होते. यावर्षी उन्हाळी कांद्याचे लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून या मार्चमध्ये उन्हाळी नवीन कांदा बाजारपेठेत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.यावर्षी उन्हाळ कांद्याची लागवड अधिक झाल्याने कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात येईल परंतु साठवणूक दार ही कृत्रिम दराची घसरण करत असल्याचे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत.
जर आपण एपीएमसी मार्केटचा विचार केला तर अगोदर शंभर गाड्यांची आवक होत होती परंतु आता ते 150 गाड्यांपर्यंत पोचली आहे. बाजारामध्ये आवक वाढली आहे परंतु त्या मानाने मागणी कमी असल्याने दरात घसरण होत आहे. वीस ते 33 रुपये असलेले कांदे आता दहा ते बारा रुपयांनी घसरून चक्क 10 ते 19 रुपयांवर आले आहेत पुन्हा कांद्याचे दर घसरतील अशी शक्यता आहे.
मात्र ही कृत्रिम घसरण आहे जेणेकरून शेतकरी त्यांचे कांदा उत्पादन लगेच विक्रीला काढेल आणि साठवणूकदार कमी भावाने कांदे खरेदी करून साठवणूक करतील आणि नंतर कांद्याची टंचाई भासेल आणि दर वाढतील तेव्हा हे साठवणूक केलेले कांदे विक्रीला काढले जातात असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.तेव्हाशेतकऱ्यांनी संयम ठेवून कांदे विक्रीला आणावी असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
Share your comments