
onion producers get justice
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव पडले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. असे असताना यावर मार्ग काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एक मार्ग सांगितला आहे. ते म्हणाले, भारताचा सर्वाधिक कांदा हा बांग्लादेश आणि श्रीलंकामध्ये निर्यात होत होता. विशेषत: बांग्लादेश भारताच्या एकुण कांद्याच्या निर्यातीच्या ६० टक्के कांदा खरेदी करत होता.
परंतु केंद्र सरकारचे आयात निर्यात बाबतींचे लहरी धोरण अचानक निर्यात बंदी लावणे यासारख्या प्रकारास कंटाळून भारताला अद्दल घडविण्यासाठी म्हणून भारतीय कांद्याच्या आयातीस वेगवेगळे निर्बंध लावून भारताचा बांग्लादेशमध्ये आयात होणार नाही. याची दक्षता घेतली व इराककडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केला.
आपले एक हक्काची बाजारपेठ गमावून बसलो श्रीलंकेतील अंतर्गत यादवीमुळे तिथेही निर्यात बॅच आहे. तशातच दुष्काळात १३ वा महिना या म्हणीप्रमाणे नाफेडने कांदा खरेदी बंद करून आपलाच खरेदी केलेली कांदा स्थानिक बाजारात विकायला सुरू केली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव धडाधड कोसळू लागले आहेत.
शेतकऱ्यांनो तुषार सिंचनासाठी मिळणार २५ हजार रुपये, असा घ्या लाभ..
केंद्र सरकारला आता खडबडून झोपेतून जागे व्हावे आणि नाफेडच्या कांदा विक्री बंद करून खरेदी सुरू करावी अजून अडीच लाख टन कांदा खरेदी करावा. आणि बांग्लादेश जर आमचा कांदा घेणार नसेल कांद्याच्या निर्यातीस अडथळा आणत असेल तर बांग्लादेशातून आयात होणा-या कापड आणि तयार कपड्यांच्या आयातीत अडथळा निर्माण करावेत तरच ख-या अर्थाने कांदा उत्पादकांचे न्याय मिळेल, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
कीटकनाशकातून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका! फवारणी करताना घ्या अशी काळजी, धक्कादायक माहिती आली समोर
लम्पी त्वचा रोगाने राजस्थानमध्ये हाहाकार, ४ हजार जनावरे दगावली..
ही माझी निवडणूक नसून माझे लग्न आहे, आणि त्यांनी करून दाखवले, हटके विवाहाची राज्यात चर्चा..
Share your comments