सध्या कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर नाफेडच्या सबएजन्सीच्या सब एजन्सीकडून कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय मात्र कागदपत्रांच्या अटीशर्तीच्या पूर्ततेमुळे शेतकरी त्रस्त आहेत.
नाफेड ने नेमलेल्या एजन्सी न्यूट्रोव्ही ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने त्यांची सब एजन्सी कृष्णधारा फार्मर्स प्रोडूसर कंपनीने लासलगाव येथे कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर गेल्या दोन दिवसात 720 क्विंटल कांदा खरेदी झाला असून 870 ते 937 रुपये इतका दर प्रतिक्विंटाला देण्यात आला आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून आधार कार्ड बँक पासबुक व सातबारा उताऱ्यावरील पीक पेऱ्याची नोंद बघितली जाते. यानंतर 10 ते 12 दिवसात आम्हाला पेमेंट मिळतो त्यानंतर आम्ही ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतो.
Kisan Drone: आता फवारणी होणार सोपी; ICAR 300 'किसान ड्रोन' खरेदी करणार
पिंपळगाव बाजार समितीमध्ये साडेचारशे ते सहाशे रुपये दरम्यान विक्री केला. या कांद्यातून उत्पादन खर्च तर दूरच शेतातून कांदा काढणी आणि वाहतुकीचा खर्च निघाला नाही. गेल्या दोन दिवसात लासलगाव येथील नाफेडच्या केंद्रावर चार ट्रॅक्टर मधून शंभर ते सव्वाशे क्विंटल कांदा विक्री केला असून या कांद्याला 870 ते 937 रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे. बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या कांद्याची रोख पैसे मिळतात.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारचे 7.5 लाख टन बाजरी खरेदीचे उद्दिष्ट; शेतकऱ्यांना होणार फायदा
मात्र नाफेडच्या केंद्रावर विक्री केलेल्या कांद्याची पंधरा ते वीस दिवसांनी पैसे मिळत असल्याने समाधान व्यक्त करत कागदपत्रांची असलेली पूर्तता करण्यासाठी दमछाक होत असल्याने या सभेच्या बाजार समितीमध्ये कांदा खरेदीची परवानगी दिल्यास व्यापारी आणि एजन्सीमध्ये स्पर्धा होऊन यापेक्षाही दोन रुपये नक्कीच अधिक बाजार भाव मिळेल.
Share your comments