सध्या पावसामुळे कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा डिसेंबरपर्यंत कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे देशातील बहुतांश शहरांमध्ये कांद्याच्या किंमत वाढण्याची शक्यता आहे.
सरकारी आकडेवारीनुसार २०२० मध्ये भारतातील कांद्याची सरासरी किरकोळ किंमत ३५.८८ रुपये होती. ती २०२१ मध्ये सरासरी किरकोळ किंमत ३२.५२ रुपये झाली. याचबरोबर २०२२ मध्ये ती २८ रुपये प्रति किलो राहिली. दरम्यान आता २०२३ मध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत.
असे असताना मात्र, येत्या काही महिन्यांत त्याची किंमत वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता २०२३ मध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत. मात्र, येत्या काही महिन्यांत त्याची किंमत वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
माळवी गाय तुम्हाला श्रीमंत करेल, सर्वात जास्त दूध देणाऱ्या जातींपैकी एक
केंद्र सरकार २०२३-२४ हंगामासाठी ३ लाख टन कांदे बफर स्टॉकमध्ये ठेवणार आहे. कोणत्याही मालाच्या किमती स्थिर करण्यासाठी बफर स्टॉक ठेवला जातो. जेव्हा पुरवठा कमी असतो आणि किंमती वाढत असतात तेव्हा या स्टॉकचा उपयोग केला जातो.
माळवी गाय तुम्हाला श्रीमंत करेल, सर्वात जास्त दूध देणाऱ्या जातींपैकी एक
२०२१-२२ मध्ये कांद्याचे उत्पादन ३१.६९ दशलक्ष टनांवरून ३१.०१ दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. याबाबत भारत सरकारने एक अहवाल सादर केला होता. सरकारने सुमारे दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून सुमारे ०.१४ दशलक्ष टन कांद्याचा साठा खरेदी केला आहे.
आता 'त्या' जमिनीचे देखील होणार व्यवहार! पुनर्वसनाच्या जमिनीबाबत विखे पाटलांची मोठी घोषणा...
राजू शेट्टींची मोठी घोषणा! छोट्या पक्षांची एकजूट करत नव्या आघाडीची केली घोषणा...
पीककर्जासाठी सीबिल स्कोरची अट रद्द करावी! सरकारचा नियम फक्त कागदावर बँका ऐकत नाहीत...
Share your comments