राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त कांदा लागवड बघायला मिळते. या खरीप हंगामात राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पावसाळी कांदा लागवड केली होती. म्हणून या महिन्यात राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील कांद्याची बाजारपेठेत मोठी आवक बघायला मिळाली, राज्यातील अग्रगण्य बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जास्त आवक झाल्याने सोलापूर एपीएमसी दोन-तीन दिवस बंद ठेवावी लागली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोलापूर बाजार समिती बंद ठेवल्याने कांद्याची बाजार भाव कमी होतील अशी आशंका होती परंतु सोलापूर एपीएमसी कांद्याच्या लिलावासाठी दोन दिवस बंद पाडून देखील कांद्याचे बाजार भाव तेजीतच राहिले त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठे प्रसन्न असल्याचे चित्र बघायला मिळाले होते. कांद्याची राज्यातील सर्व बाजारपेठेत मोठी आवक बघायला मिळाली मात्र असे असले तरी कांद्याचे बाजार भाव कायमच तेजीत राहिले त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा मोठा रडवीत होता.
त्यामुळे केंद्र सरकारवर कांद्याचे दर कमी करण्यासाठी मोठा दबाव बनविला जात होता. परिणामी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला. राज्यातील नव्हे नव्हे तर देशातील सर्वच बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक झाली असताना देखील कांद्याचे बाजार भाव तेजीतच राहील त्यामुळे मोदी सरकारने हस्तक्षेप करीत साठवलेला कांदा बाजारपेठेत पाठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कांद्याचे बाजार भाव कमालीचे कमी होतील अशी शेतकऱ्यांना भिती होती तसेच सरकारला देखील कांद्याचे बाजार भाव खाली येतील अशी आशा होती, मात्र मोदी सरकारच्या या निर्णयाचा देखील देशातील बाजारपेठेत कुठलाच परिणाम बघायला मिळत नसून कांद्याचे बाजार भाव अजूनही तेजीतच आहेत. सध्या कांद्याला देशांतर्गत बाजारपेठेत सुमारे साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळत आहे.
मोदी सरकार वर कांद्याचे दर खाली पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला त्या अनुषंगाने मोदी सरकारने साठवलेला कांदा देशातील तमाम बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी पाठवला मात्र मोदी सरकारचा हा निर्णय देखील कांद्याचे बाजार भाव खाली पाडू शकला नाही सध्या देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आलेली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला समाधानकारक बाजार भाव मिळत आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देखील कांद्याचे बाजार भाव कमी होऊ शकले नाही याउलट कांद्याच्या बाजार भावात तेजी बघायला मिळत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या चालू महिन्यात कांद्याची थोडी कमी आवक नमूद करण्यात आली त्यामुळे कांद्याच्या दरात अजूनच तेजी बघायला मिळत आहे. सध्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला सोलापूर बाजार पेठेत जवळपास 3500 रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळत आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे समाधानी असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
Share your comments