Onion Price: गेल्या काही दिवसांपासून देशात कांद्याचे (Onion) दर ढासळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा (Farmers) खर्चही निघत नाही. अजूनही शेतकरी कांद्याचे दर वाढतील या आशेने कांदा साठवणूक (Onion storage) करून बसले आहेत. मात्र अद्यापही कांद्याचे दर वाढत नसल्याचे दिसत आहे.
खरीप हंगामातील (Kharip Season) कांदा बाजारात येण्याच्या मार्गावर आहे तरीही उन्हाळी कांद्याला बाजार मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. सरकारकडूनही शेतकऱ्यांसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
मात्र शेतकऱ्यांसाठी थोडा का होईना दिलासा मिळताना दिसत आहे. नगर जिल्ह्यातील (Nagar District) बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी १७०० ते १८०० रुपये प्रति क्विटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत आहे.
Wheat Cultivation: गहू लागवडीचा विचार करताय तर या ३ जातींची लागवड करून मिळवा भरघोस उत्पन्न
बाजार समित्यांमध्ये (Market Committees) कांद्याची आवक वाढली असली तरीही कांद्याला हा भाव मिळत आहे. नगर जवळील नेप्ती उपबाजार समितीत तब्बल 51 हजार 813 क्विंटल कांद्याची आवक झाली होती.
आवक वाढल्याने भाव कमी होतील असे वाटत होते मात्र, भाव फारसे कमी झाले नाहीत. यावेळी लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला सरासरी 1300 ते 1700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी लिलावासाठी 51 हजार 813 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला 1300 ते 1700 रुपये, दोन नंबर कांद्याला 900 ते 1300 रुपये, तीन नंबर कांद्याला 500 ते 900 रुपये आणि चार नंबर कांद्याला 100 ते 500 रूपये बाजारभाव मिळाला.
राज्यातील या शहरांना मुसळधार पावसाचा धोका! हवामान खात्याने दिला ऑरेंज अलर्ट
मात्र मागील काही दिवस कांद्याची आवक कमी असतानाही कांद्याला भाव मिळत नव्हता. मात्र आता अवाक वाढूनही भाव कमी झालेले नाहीत. शेतकऱ्यांना आशा आहे की कांद्याचे भाव आणखी वाढतील आणि त्यांचा खर्च निघून थोडा का होईना नफा शिल्लक राहील.
आवक घटली मात्र कांद्याचे भाव वाढले नाहीत. मान्सूनचा पाऊस सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली. तरीही कांद्याला सरासरी १७०० ते १८०० रुपये प्रति क्विटल भाव मिळत आहे. आवक वाढीचा परिणाम कांद्याच्या दरावर होताना दिसत नाही.
महत्वाच्या बातम्या:
आनंदाची बातमी! कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण; पेट्रोल डिझेलही स्वस्त, जाणून घ्या नवे दर...
शेतकऱ्यांनो सावधान! लिंबूनीच्या झाडांना लीफ मायनर कीटकांचा धोका; ही आहेत लक्षणे
Share your comments