मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर ७० ते ८० रुपये प्रति किलोप्रमाणे उसळी घेताना दिसत आहेत. याला बरीच कारणे आहेत जसे की, शेतकऱ्यांनी जूनपासून चाळींमध्ये कांदा ठेवला होता. जास्तीचा पाऊस, तापमानातील अनावश्यक चढ-उतार यामुळे कांदा अधिक खराब होत आहे. दरम्यान जे कांदा पीक शेतकऱ्यांनी लावले होते,ते अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात खराब झाले. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम मागणीच्या मानाने पुरवठा अत्यल्प होण्यावर झाला. त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले.
या सगळ्या परिस्थितीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातली आहे. आता ठोक व्यापारी जास्तीत जास्त २५ टनापर्यंत कांदा साठवण करू शकता आणि किरकोळ व्यापारी कमाल २ टन कांदा साठवणूक करू शकतील. केंद्र सरकारने कांद्याचे होणारी सट्टेबाजी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे घातलेली मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत राहील. कांद्यावर साठा मर्यादा घातल्याने साठेबाजीला आळा बसेल सामान्यपणे कुठल्याही वस्तूची किंमत जर वाढायला लागली. तर व्यापारी साठा करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे संबंधित वस्तूंची दरवाढ आणखी होते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. कांदा साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान साठेबाज करणाऱ्यांनी किती प्रमाणात कांद्याचा साठा केला आहे, याची माहिती सरकारकडे नाही.
दरम्यान कांद्याचे वाढलेले भाव कमी करण्यासाठी सरकार परदेशातून कांदा आयात केली जात आहे. दरम्यान नाफेडने आतापर्यंत ४२ हजार टन कांद्याची विक्री केली आहे. इतकी विक्री केल्यानंतर नाफेडकडे २० ते २५ हजार टन इतका साठा पडून आहे. नाफेडने यावर्षी ९८ हजार टनांचा साठा केला होता.
Share your comments