कांदा हे एक एक नगदी पीक आहे. नगदी पीक म्हणजे जे पीक आपल्याला बक्कळ नफा मिळवून देईल. आपल्याकडे उसानंतर सर्वात जास्त कांदा हे पीक घेतले जाते. कारण कमी कालावधीत कांदा बक्कळ पैसे मिळवून देऊ शकतो. कांद्याच्या दारात नेहमी चढउतार पाहायला मिळतो. आत्ता उन्हाळी कांद्याच्या काढणीला आणि विक्रीला वेग आला आहे.
कांद्याचे भाव 1300 ते 1500 रुपये प्रती क्विंटल यावर स्थिरावले आहेत. मात्र, पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काही मोजक्या वक्कलला 3770 हजार रुपये इतका भाव मिळत आहे. खरीप हंगामात झालेल्या वातावरणातील अमुलाग्र बदलामुळे खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकाला मोठा फटका बसला.
आधी अतिवृष्टी व कांदा काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळी मुळे खरीप हंगामातील लाल कांदा बऱ्याच अंशी सडला होता. यामुळे उत्पादनात मोठी घट नमूद करण्यात आली होती. खरीप हंगामात निसर्गाच्या या अवकृपेमुळे कांद्याचा दर्जा खालावला गेला असल्याचे तज्ञांचे मत आहे. सध्या चांगल्या दर्जाच्या कांद्याला विक्रमी बाजार भाव मिळत असल्याचे समजत आहे.
कांद्याचे उत्पादन खर्चात मोठी वाढ
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, वर्षानुवर्षे कांद्याचा उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. बदलत्या वातावरणामुळे कांदा या नगदी पिकावर महागड्या औषधांची किटकनाशकांची, फवारणी करणे अपरिहार्य झाले असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. तसेच कांद्याच्या बियाण्यात, खतांमध्ये, याशिवाय पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतुक खर्चात झालेली वाढ यामुळे कांद्याचे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.
Share your comments