गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला दर नसल्याने शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत. असे असताना आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एपीएमसी बाजारात कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत.
10 ते 12 रुपये असलेला कांदा आता 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहचला आहेे. यामुळे शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. नवीन पीक येण्यास अजून एक ते दीड महिना जाऊ शकतो, त्यामुळे दर अजून वाढण्याची शक्यता व्यापारी करत आहेत.
त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आधीच महागाईची झळ पोहचली असताना कांदा अजून रडवताना दिसत आहे. मात्र शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून कांदा शेतकऱ्यांना रडवताना दिसून येत आहे.
देशभरात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतोय, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
असे असताना बाजारात नवीन पीक येईपर्यंत अजून किती दर वाढतात हे पाहणे महत्वाचे आहे. अवकाळी पावसामुळे नवीन पीक खराब झाल्याने नवीन कांदा बाजारात येऊ शकला नाही, त्यात जूने कांदे हे जवळपास संपले आहेत.
आता सोयाबीनपासून बनवले गुलाबजाम आणि पनीर, शेतकरी बनला लखपती..
यामुळे याचा थेट परिणाम हा कांद्याच्या बाजारावर झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा दर असाच राहावं अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
भारतात झपाट्याने वाढतेय रताळ्याची मागणी, लागवडीनंतर काही दिवसांमध्येच शेतकरी लखपती
गायरान जमीन खासगी वापरासाठी, कृषिमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत
सरकार म्हणतंय खतांचा पुरेसा साठा, मात्र युरियासाठी शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ
Share your comments