कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात गुरुवारी अर्थात 4 तारखेला गेल्या पाच महिन्यातला सर्वात निचांकी दर मिळाला आहे. अहमदनगर एपीएमसीमध्ये गुरुवारी चांगल्या दर्जाच्या कांद्याला 1500 ते 2100 रुपये प्रति क्विंटल दरम्यान बाजारभाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था बनली आहे.
ऑक्टोबर 2021 पासून कांद्याला सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल 3 हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यान बाजार भाव मिळत होता, सलग पाच महिने टिकून राहिलेला बाजारभाव या मार्च महिन्यातील चार दिवसात कमालीचा घसरला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या विवेचनात सापडला असल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले. गेल्या पाच महिन्यापासून कांद्याला समाधान कारक बाजार भाव मिळत होता. जून 2021 ते मागील महिन्यापर्यंत कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत राहिला आहे. बाजारात सध्या गावरान तसेच लाल कांदा बघायला मिळत आहे.
चांगल्या लाल कांद्याला सुरुवातीला दोन हजार रुपये पर्यंत बाजार भाव मिळत होता, मध्यंतरी मात्रे लाल कांद्याच्या बाजारभावात थोडी सुधारणा बघायला मिळाली आणि कांद्याचे बाजार भाव 3200 रुपये प्रति क्विंटल वर जाऊन पोहोचले. मागील महिन्यापर्यंत कांद्याचे बाजार भाव टिकून होते, परंतु या महिन्यात अवघ्या चारच दिवसात तीन हजार रुपये प्रतिक्विंटलने विक्री होणारा कांदा 2100 रुपये प्रतिक्विंटल वर येऊन ठेपला आहे.
गुरुवारी अहमदनगर एपीएमसीमध्ये 1,10,000 गोणी कांदा आवक झाली. यामध्ये चांगल्या दर्जाच्या कांद्याला केवळ 1500 रुपये ते 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
Share your comments