नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेले लासलगाव व त्यापाठोपाठ येवला या दोन बाजार समित्यांनी आज सोमवती अमावस्याला कांदा लिलाव सुरू ठेवून गेल्या सत्तर वर्षांची परंपरा मोडीत काढली.
अमावस्याच्या दिवशी कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याची परंपरा मोडीत काढण्याचे आव्हान राज्याचे अन्न व नागरी,पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करत आज प्रथमच 70 वर्षानंतर कांद्याचे लिलाव सुरू ठेवून ही प्रथा मोडीत काढली.
आज पोळा आणि श्रावण महिन्याची अमावस्या असल्याने या जुन्या परंपरेला तिलांजली देत येवला बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले.शेतकऱ्यांनीही या दिनाला चांगला प्रतिसाद देत आपल्या 250 वाहनाद्वारे पाच हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला. येवला बाजार समितीत आज कांद्याला किमान पाचशे ते कमाल सोळाशे 70 रुपये भाव मिळाला.
त्याचबरोबरीने लासलगाव बाजार समितीतही म्हणजे या बाजार समितीची स्थापना दिनांक 1 एप्रिल 1947 पासून अमावस्याला कांदा लिलाव बंद ची परंपरा पाळली जात होती. परंतु ही परंपरा लासलगाव बाजार समितीने मोडीत काढत आज अमावस्या च्या दिवशी दिला सुरू ठेवले. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीचे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली आहे.
Share your comments